शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड महिला मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:57 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ भरधाव एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड मजूर महिला ठार झाली, तर दहाजण गंभीर जखमी झाले. चंद्रभागाबाई गंगाधर खाजेकर (वय ६०, रा. ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा अपघात झाला.

ठळक मुद्दे बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड महिला मजूर ठारदहा गंभीर : निपाणजवळील दुर्घटना

कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ भरधाव एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड मजूर महिला ठार झाली, तर दहाजण गंभीर जखमी झाले. चंद्रभागाबाई गंगाधर खाजेकर (वय ६०, रा. ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा अपघात झाला.अधिक माहिती अशी, जालना येथील ऊसतोडणी मजुरांच्या १५ टोळ्या कर्नाटकातील एका कारखान्याकडे निघाल्या होत्या. मुकादम स्वत:च्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून १५ प्रमुख कामगार व त्यांचे कुटुंबीय असे २३ ते २५ जणांना घेऊन शुक्रवारी दुपारी जालन्यातून बाहेर पडला. शनिवारी सकाळी निपाणीपासून काही अंतरावर एमकेएस मोटर्सजवळ बायपास रोडने ते कर्नाटकात जात होते.

यावेळी ओव्हरटेक करीत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भरधाव एसटी बसने ट्रॅक्टरला एका बाजूने धक्का दिला. त्यामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. दोन्ही ट्रॉलीतील मजूर बाहेर रस्त्यावर फेकले गेले. मजुरांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.

जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापूर, निपाणी व कागल येथील रुग्णालयांत पाठवले. चंद्रभागाबाई खाजेकर यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बसचालक न थांबता बससह पळून गेला, तर ट्रॅक्टरचालकही पळून गेला. निपाणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.जखमींची नावे अशी :लक्ष्मण सोलाजी मिसाळ (वय ६५), प्रवीण प्रशांत आर्सड (२२), भारतीबाई लक्ष्मण मिसाळ (५५), निशा भाऊसाहेब खाजेकर (८), शीतल भाऊसाहेब खाजेकर (२० रा. सर्व ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना). लक्ष्मण मिसाळ याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर