शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

कोल्हापूरचे पर्यटक इराणमध्ये सुरक्षित; कुटुंबीयांना न घाबरण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 22:56 IST

पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेलेले कोल्हापूरसह सांगली, सोलापूर व पुण्यातील ४० पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत.

कोल्हापूर : पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेलेले कोल्हापूरसह सांगली, सोलापूर व पुण्यातील ४० पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत. मंगळवार दिनांक ३ते परतणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पर्यटकांशी संपर्क साधून दिलासा दिला आहे. कोरोना विषाणूमुळे विमानसेवा रद्द केल्याच्या चर्चेने पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी आपण सुरक्षित आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.

कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील मुस्लीम भाविक व पर्यटक वर्षातून दोनवेळा इराण, इराक येथील धार्मिकस्थळे व पर्यटनस्थळे पाहण्यासाठी जात असतात. त्याप्रमाणे यंदाही एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून आयोजक व गाईड मुन्ना पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक इराण, इराक दौºयावर पर्यटनासाठी गेले आहेत. हे सर्व पर्यटक मुंबईहून विमानाने तेहरान (इराण) येथे पोहोचले. त्यानंतर इराणमधील धार्मिकस्थळे व पर्यटनस्थळे पाहून झाल्यानंतर इराकमधील धार्मिक व स्थळे पाहण्याचे नियोजन होेते. परंतु इराक सरकारने विमान वाहतुकीसाठी आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व पर्यटक इराणमध्येच अडकले.

पुढे जाण्याचा मार्ग बंद झाल्याने इराणमधील बुस्तान, सीमनान, खरगण, निशाबोर, तेहरान या शहरांतील धार्मिकस्थळांना पर्यटक भेटी देत आहेत. नियोजनाप्रमाणे ३ मार्चला हे पर्यटक पुन्हा विमानाने भारतात येणार आहेत. तोपर्यंत पर्यटकांना इराणमधील धार्मिकस्थळे दाखविली जात असून, त्यांच्या राहण्या-खाण्याची अत्यंत चांगल्याप्रकारे सुविधा केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे विमानसेवा बंद झाल्याने पर्यटक इराकमध्ये अडकले आहेत, अशी चर्चा भारतात त्यांच्या कुटुंबियांच्या कानावर आली आहे. त्यामुळे कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यांच्याकडून संबंधितांना फोन करून ख्यालीखुशाली विचारली जात आहे. सहलीला गेलेले बहुतांश पर्यटक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. घरातून वारंवार फोन येत असल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

इराणमधील भारतीय वकिलातीशी संपर्क

भारताकडे जाणाऱ्या दोन विमानसेवा रद्द झाल्याने आयोजक मुन्ना पठाण यांनी इराणमधील भारतीय वकिलातीमध्ये जाऊन ३ मार्चची विमानसेवा रद्द होऊ नये, यासाठी भारत सरकारला कळवावे, अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा

कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक इराणमध्ये अडकल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तात्काळ टूर्सचे संयोजक मुन्ना पठाण यांच्यासह पर्यटकांशी संपर्क साधला. काही अडचण असल्यास कळवावे, अशा शब्दांत दिलासा दिला. दररोज पर्यटकांशी जिल्हाधिकाऱ्यांकडून संवाद सुरू असल्याचे सांगण्यात आले.सर्व पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे मंगळवारी आम्ही सर्वजण भारतात परतणार आहोत. बहुतांश पर्यटक हे ज्येष्ठ असल्याने त्यांची औषधे केव्हाही संपू शकतात. त्यामुळे इराणमधून भारतात येणारे विमान हे रद्द न होता ते ठरलेल्या वेळेप्रमाणे येईल, या दृष्टीने प्रशासन व सरकारच्या पातळीवर प्रयत्न व्हावेत.-मुन्ना पठाण, आयोजक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रIranइराण