महिला वरिष्ठ गट कुस्ती निवड चाचणीत कोल्हापूरचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:18+5:302021-01-18T04:21:18+5:30
कोल्हापूर : आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या २३व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत कोल्हापूरच्या स्वाती ...

महिला वरिष्ठ गट कुस्ती निवड चाचणीत कोल्हापूरचा वरचष्मा
कोल्हापूर : आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या २३व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत कोल्हापूरच्या स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे, दिशा कारंडेसह सातजणींनी बाजी मारत राज्य संघात स्थान पटकाविले.
पुण्यातील काजत्र येथील स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात रविवारी झालेल्या या निवड चाचणीत कोल्हापूरच्या सातजणींनी प्रतिस्पर्धी महिला कुस्तीगीरवर मात करीत संघात स्थान मिळवले. या संघाचे नेतृत्व आशियाई पदक विजेती स्वाती शिंदे (कोल्हापूर ) व अहमदनगरची भाग्यश्री फंड या महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. निवड झालेल्यांमध्ये स्वाती शिंदे (५० किलो), नंदिनी साळोखे (५३ किलो), दिशा कारंडे (५५ किलो), विश्रांती पाटील (५७ किलो), सृष्टी भोसले (६५ किलो), ऋतुजा संकपाळ (६८ किलो), पौर्णिमा सातपुते (७६ किलो, सर्व कोल्हापूर), प्रतीक्षा बागडी (७२ किलो, सांगली), भाग्यश्री फंड (६२ किलो, अहमदनगर) यांचा समावेश आहे. या निवडी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
फोटो : १७०१२०२१-कोल-कुस्ती
आेळी : आग्रा येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात निवड चाचणी झाली. या संघासोबत बाळासाहेब लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.