शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा बंद होण्याची शक्यता, प्रतिसाद कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:58 IST

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद बाजूला ठेवून याविरोधात आवाज उठविणे गरजेचे

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना तिरूपती देवस्थानाविषयी असणारी आपुलकी, दोन देवस्थानांच्या माध्यमातून दोन शहरांमध्ये जोडल्या गेलेल्या याच आध्यात्मिक स्नेहातून साडेचार वर्षांपूर्वी सुरू झालेली कोल्हापूर-तिरूपती ही विमानसेवा इंडिगो कंपनी बंद करणार आहे. या सेवेला प्रतिसाद कमी असल्याचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु, या दोन धार्मिक क्षेत्रांना जोडण्यासाठी सुरू झालेली ही सेवा आहे. त्यावेळी शंभर टक्के प्रतिसादाची अट नव्हती.साडेचार वर्षांपूर्वी कोल्हापूर-तिरूपती ही ७५ प्रवासी क्षमता असणारी विमानसेवा इंडिगो कंपनीकडून सुरू करण्यात आली. या विमानसेवेला सुरूवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, आता प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत कंपनीकडून येत्या १५ डिसेंबरपासून ही सेवा बंद करण्यात येत आहे. विमानतळावर कार्यरत कंपनीच्या व्यवस्थापनाला वरिष्ठ कार्यालयाने तसे कळविले आहे. तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर असंख्य भाविक अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येतात. हाच धागा जोडत दोन शहरांमधील आध्यात्मिक बंध या सेवेने जोडले गेले होते. मात्र, आता ही सेवा बंद केल्यास या दोन्ही मंदिरांचे दर्शन करू इच्छिणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. शिवाय, दोन्ही शहरांमधील आर्थिक उलाढालीवरही परिणाम होणार आहे.

सेवा द्यायची नसेल तर गाशा गुंडाळाही सेवा सुरू झाल्यापासून सव्वा लाखांच्या आसपास प्रवाशांनी कोल्हापूर-तिरूपती सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद तसा चांगलाच आहे. पण कंपनीला शंभर टक्के प्रवाशांची अपेक्षा आहे. ती मिळत नसल्यानेच सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कंपनीला ही सेवा द्यायची नसेल तर त्यांनी येथील व्यवस्थापन काढून घेत दुसऱ्या विमान कंपनीला सेवा सुरू करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

श्रेयवाद बाजूला ठेवाएकीकडे कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण करून त्याला अधिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. इंदौर, शिर्डेी, नागपूर या मार्गांवर नव्याने सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले जात आहेत. तर दुसरीकडे आहे त्या सेवाच बंद होत असल्याने या विमानतळाचे भवितव्य टांगणीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद बाजूला ठेवून याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.

अंबाबाई व तिरूपती बालाजी या दोन देवस्थानांमध्ये पारंपरिक आध्यात्मिक नाते आहे. या विमानसेवेने ते अधिक वृद्धिंगत झाले आहे. कोल्हापुरातून तिरूपतीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही सेवा बंद होऊ देणार नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू. - विकासराव माने, सदस्य, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळtirupati-pcतिरुपतीairplaneविमान