शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

कोल्हापूर :  प्रवेशाचे आमिष दाखवून शिक्षकाला साडेतीन लाखांचा गंडा, सांगलीच्या भामट्यावर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:13 IST

मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये मुलाला बारावीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीच्या भामट्याने शिक्षकाला सुमारे साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित भामटा मिलींद जनार्दन जोशी (रा. बिनीवाले विठ्ठल मंदीर, मारुती चौक, सांगली) याचेवर गुरुवारी (दि. ६) लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देप्रवेशाचे आमिष दाखवून शिक्षकाला साडेतीन लाखांचा गंडा सांगलीच्या भामट्यावर गुन्हा 

कोल्हापूर : मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये मुलाला बारावीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीच्या भामट्याने शिक्षकाला सुमारे साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित भामटा मिलींद जनार्दन जोशी (रा. बिनीवाले विठ्ठल मंदीर, मारुती चौक, सांगली) याचेवर गुरुवारी (दि. ६) लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रतापराव जगन्नाथ खरात (वय ४९, रा. सूर्यवंशी कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) हे शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा वैभव हा शिक्षण घेत आहे. त्यांची संशयित मिलींद जोशी याचेशी पत्नीच्या माहेरकडून ओळख झाली होती.

यावेळी जोशी याने तुमच्या मुलग्याला मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद या संस्थेच्या डिफेन्स अरिअर अकॅडमीमध्ये बारावीसाठी प्रवेश मिळवून देतो, असे विश्वासाने सांगून २०१७ मध्ये त्यासाठी वेळोवेळी खरात यांचेकडून ३ लाख ६० हजार रुपये घेतले.

पैसे देवूनही प्रवेश न मिळाल्याने आपली फसवणूक झालेचे खरात यांचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी लक्ष्मीपूरी पोलीसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वसंत बाबर तपास करीत आहेत.

फसवणूक प्रकरणातील आरोपी सांगली येथील राहणारा आहे. गुन्हा दाखल झालेपासून त्याचा मोबाईल बंद आहे. त्याला अटक करण्यासाठी शुक्रवारी पथक सांगलीला रवाना केले आहे.वसंत बाबर, पोलीस निरीक्षक, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSangliसांगली