कोल्हापूर देवस्थान समितीने किरणोत्सवातील अडथळे हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:41 AM2017-11-11T00:41:28+5:302017-11-11T00:52:43+5:30

Kolhapur Temple Committee removed the barriers to radiation | कोल्हापूर देवस्थान समितीने किरणोत्सवातील अडथळे हटविले

कोल्हापूर देवस्थान समितीने किरणोत्सवातील अडथळे हटविले

Next
ठळक मुद्दे पालिकेस शक्य नसल्यास नुकसानभरपाई देऊदेवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव जगभरातील भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. मोजक्या इमारतींच्या काही भागांमुळे देवीच्या किरणोत्सवात अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेने हे अडथळे काढून मिळकतदारांना नुकसानभरपाई द्यावी, महापालिकेला ते शक्य नसेल तर देवस्थान समिती नुकसानभरपाई देईल, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, सकाळी किरणोत्सवात बाधा ठरणाºया इमारती, बोर्ड, पत्र्याच्या छपरी, वीजेच्या वायरी असे शक्य तितके अडथळे शुक्रवारी देवस्थान समितीच्यावतीने काढण्यात आले.

अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळे काढण्यात मनपा कर्मचाºयांनी स्वारस्य दाखविले नाही. अखेर गुरुवारी झालेल्या किरणोत्सवानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी देवस्थान समितीच्या वतीने अडथळे काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, विजय पोवार, एस. एस. साळवी, प्रशांत गवळी, सुदेश देशपांडे यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी महाद्वार रोडवर आले. सर्वांनी इमारतधारकांना सूचना केली. काहीजणांनी स्वत:हून अडथळे काढले. दुसरीकडे देवस्थान अध्यक्षांसह सर्व कर्मचाºयांनी अडथळे हटविण्यास सुरवात केली. वैद्य यांची इमारत, आगळगावकर, मिणचेकर इमारतींचे दोन फुटांचे कट्टे, डिजिटल फलक, असे अडथळे हटविले.

दरम्यान, अध्यक्ष महेश जाधव यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना महापालिकेने अडथळे हटविण्यासंबंधी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा संबंधित अधिकाºयांबाबत कठोर पाऊल उचलले जाईल, असा इशाराही दिला.

कर्मचारीचआले नाहीत...
काही मिळकतधारकांनी देवस्थानच्या पदाधिकाºयांना सांगितले की आम्ही यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाºयांना करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सवात येणार अडथळे काढण्यासाठी सहमती दिली होती.मात्र महापालिकेच्या प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले परिणामी येथील अडथळे काढण्यास कर्मचारीच आले नाही.

सूर्यकिरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंत
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात शुक्रवारी सूर्यकिरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने किरणोत्सव मार्गातील काही अडथळे काढल्याने एरव्ही मूर्तीच्या डावीकडे वळणाºया किरणांची दिशा सरळ होती. त्यामुळे किरणे पूर्ण मूर्तीवर पसरली होती. थंडीचे दिवस असले सूर्यास्त लवकर होत असला तरी बुधवारपासून सुरू असलेला अंबाबाईचा किरणोत्सव तिसºया दिवसापर्यंत योग्यरितीने सुरू आहे. सूर्यकिरणाांच्या मार्गात असलेल्या अडथळ््यांमुळे बुधवारी व गुरुवारी किरणे अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणापर्यंत व गुडघ्यापर्यंत आल्यानंतर मूर्तीच्या डावीकडे सरकली. शुक्रवारी मात्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन किरणांच्या मार्गातील शक्य तितके अडथळे काढले. इमारतींचे

दोन-तीन फुटांचे बांधकाम उतरविल्याने शुक्रवारी सूर्यकिरणांची दिशाा सरळ रेषेत होती. अगदी देवीच्या उजव्या हाताजवळ असलेल्या गदेपर्यंत सूर्यकिरणे आली होती. सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी गरूड मंडपात आलेली किरणे ५ वाजून ४७ व्या मिनिटाला अंबाबाईच्या खांद्यापर्यंत आली आणि लुप्त झाली.

Web Title: Kolhapur Temple Committee removed the barriers to radiation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.