कोल्हापूर :  पूर्व वैमन्स्यातून तलवार हल्ला, तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:48 PM2018-12-10T13:48:34+5:302018-12-10T13:50:04+5:30

जुनावाशी नाका येथे पूर्व वैमन्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सुरज सूर्यवंशी (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Kolhapur: The sword was attacked by the former Vamans, the young injured | कोल्हापूर :  पूर्व वैमन्स्यातून तलवार हल्ला, तरुण जखमी

कोल्हापूर :  पूर्व वैमन्स्यातून तलवार हल्ला, तरुण जखमी

ठळक मुद्देपूर्व वैमन्स्यातून तलवार हल्ला, तरुण जखमीजुनावाशी नाका येथील घटना : वाहनांची तोडफोड : चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : जुनावाशी नाका येथे पूर्व वैमन्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सुरज सूर्यवंशी (वय २०) असे त्याचे नाव आहे.
त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित स्वप्निल पाथरुट, ओंकार मुनीर रिक्षावाला, कार्लोस, अभि रिक्षावाला (सर्व रा. गंजीमाळ, कोल्हापूर) यांचेवर गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी, अमित पाटील आणि स्वप्निल पाथरुट यांचेत पूर्वीचे वाकुडपणाचे कारणावरुन वाद आहे. धीरज सूर्यवंशी हा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपले राहते घराचे समोर फिरत असताना संशयित तलवार, काठ्या घेवून आले. त्यांनी धीरजला अमित पाटील कुठे आहे अशी विचारणा केली. ते सांगण्यास नकार दिल्याने धीरजला मारहाण करीत उजवे डोळ्यावर तलवारीने वार केला.

तसेच सुशिला सुरेश जाधव, यांची मोपेड, सिध्देश राजु जगताप यांची दूचाकीची तोडफोड करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. संशयित हे सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: The sword was attacked by the former Vamans, the young injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.