शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मुंबईतील सराफ व्यापार लूटमार केल्याप्रकरणी संशयितांचा सुगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:07 IST

मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या चाळीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

ठळक मुद्देमुंबईतील सराफ व्यापार लूटमार केल्याप्रकरणी संशयितांचा सुगावागुजरीतील प्रकरण : तपासाची चक्रे कारभोवती, मुंबईला पथकदोन तास अगोदर केली संशयितांनी टेहळणी

कोल्हापूर : मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या चाळीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. त्यासाठी एक पथक मुंबईला गेले आहे. त्यामुळे लवकरच या लूटमारीचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी वर्तविली आहे.मुंबईतील सराफ व्यापारी कांतिलाल मेहता (वय ५३, रा. गोकुळ को-आॅप. हौसिंग सोसायटी, एम. जी. रोड, बोरिवली, पूर्व) हे मुंबईहून कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक येथे खासगी आरामबसने बुधवारी (दि. ७) सकाळी आले. तेथून ते रिक्षाने गुजरी येथे आले.

रिक्षातून उतरून ते गुजरीतील मरुधन भवन या यात्री निवाससमोर आले असता अचानक मेहता यांच्या पाठीमागून दोघे संशयित तरुण आले. मेहता यांना बंदुकीचा धाक दाखवीत बांबूच्या काठीने मारहाण केली. यावेळी समोरूनही दोघे तरुण आले.

या चौघांनी मेहता यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली व कपिलतीर्थ मार्केटच्या दिशेने ते पसार झाले. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुजरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले.दरम्यान, या गुन्ह्यात संशयितांनी कार वापरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सात पथके स्थापन केली आहेत. त्यांतील एक पथक मुंबईला गेले आहे. या कारचा नंबर, ही कार कोठून आली, याची माहिती पोलीस घेत आहेत.

दोन तास अगोदर टेहळणीसराफ व्यापारी कांतिलाल मेहता हे कोल्हापुरात येण्यापूर्वी संशयित आरोपी हे घटनेअगोदर दोन तास कोल्हापुरात आले होते. त्यांनी कोल्हापूर शहराची टेहळणी केली. घटनेअगोदरचे व त्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असल्याचे समजते. त्यामुळे लूटमार केल्यानंतर संशयित कोणत्या मार्गाने गेले आहेत, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाcctvसीसीटीव्ही