मुंबईच्या सराफाला कोल्हापूरमध्ये लुटलं, चाळीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:39 PM2018-02-07T13:39:34+5:302018-02-07T13:53:04+5:30

मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांचेकडील चाळीस लाख किंमतीचे एक किलो सोन्याचे दागिने चौघा लुटारुंनी लुटन पोबारा केला. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास गुजरीतील मरुधन भवन या यात्री निवासच्या समोर ही घटना घडली.

Mumbai's gold jewelery stolen in Kolhapur, 40 lacs gold jewelery worth Rs | मुंबईच्या सराफाला कोल्हापूरमध्ये लुटलं, चाळीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

मुंबईच्या सराफाला कोल्हापूरमध्ये लुटलं, चाळीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देबंदूकीचा धाक दाखवून मारहाण, गुजरीतील पहाटेची घटनासर्वत्र नाकाबंदी करुन लुटारुंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्ट, आठ विशेष पथके काढत आहेत चोरट्यांचा माग

कोल्हापूर : मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांचेकडील चाळीस लाख किंमतीचे एक किलो सोन्याचे दागिने चौघा लुटारुंनी लुटन पोबारा केला. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास गुजरीतील मरुधन भवन या यात्री निवासच्या समोर ही घटना घडली.

या घटनेमुळे पोलीस दल हादरले असून सर्वत्र नाकाबंदी करुन लुटारुंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्ट दिसत आहेत. त्यावरुन आठ विशेष पथके चोरट्यांचा माग काढत आहेत.

अधिक माहिती अशी, कांतीलाल जसवंतराज मेहता (वय ५३, रा. गोकुळ को. आॅप. हौसींग सोसायटी, एम. जी. रोड बोरीवली (पूर्व) मुंबई) हे सोन्याचे होलसेल व्यापारी आहेत. बुधवारी पहाटे खासगी आरामबसने ते मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. तेथून रिक्षाने गुजरीतील जैन श्वेतांबर मंदिरानजीक सहाच्या सुमारास उतरले.

बाहेरुनच दर्शन घेवून ते पुढे चालत मरुधन भवनसमोर आले. यावेळी पाठिमागुन दोघे तरुण आले. त्यांनी बंदूकीचा धाक दाखवित बांबुच्या काठीने त्यांना मारहाण केली. यावेळी समोरुन दोघे तरुण आले. या चौघांनी त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या हातातील बॅग हिसकावून कपीलतीर्थ मार्केटच्या दिशेने पलायन केले.

या प्रकाराने मेहता भांबावुन गेले. त्यांना काहीच सुचेनासे झाले. त्यांनी चोर...चोर म्हणून आरडाओरड केली. यावेळी यात्री निवासमधील वॉचमन बाहेर पळत आला. मेहता यांनी मित्र रणजित पारीख यांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. पारीख यांनी थेट जुना राजवाडा पोलीस ठाणे गाठले.

पोलीसांना लुटमारीची घटना समजताच कंट्रोलरुमवरुन सर्व पोलीस ठाण्यांना सर्तक करण्यात आले. काही क्षणातच लागोपाठ पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक
डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक अनिल गुजर, दिनकर मोहिते, तानाजी सावंत, संजय मोरे, अशोक धुमाळ यांचेसह गुन्हे शाखेच्या टीम घटनास्थळी आल्या.

मेहता यांनी दिलेल्या वर्णनानुसार लुटारु हे आरर्टीका कारमधून आले होते. ती कार कपीलतीर्थ मार्केटच्या दिशेने गेली होती. त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन लुटारुंचा माग काढण्यासाठी तत्काळ आठ पथके रवाना केली. शहरातून बाहेर पडणाऱ्या नऊ नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. परंतू चोरटे काही हाती लागले नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारुचे चित्रिकरण

गुजरीरोडवरील मरुधन भवनच्या प्रवेशद्वारात तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच जैन मंदिरापासून पाच ते सहा सराफी दूकानांसमोरही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीसांनी पाहिले असता सहा वाजून पंचावन्न मिनीटाच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची कार भवनच्या समोरुन माजी महापौर शिरीष कणेकर यांच्या घराच्या खाली थांबली.

भवनच्या समोरुन एक तरुण पुढे चालत जावून काही अंतरावर थांबला. त्याच्या पाठोपाठ मेहता भवनच्या दिशेने येत असताना पाठिमागुन कानटोप्या घातलेल्या दोघा तरुणांनी त्यांना बंदूकीचा धाक दाखवित बांबुने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. या तिघांच्यात झटापट सुरु होती. दोघे तरुण त्यांच्या उजव्या हातातील बॅग ओढण्याचा प्रयत्न करीत होते.

मेहता हे बचावासाठी धावत भवनच्या गेटवर आले. त्याला कुलूप असल्याने त्यांना आतामध्ये जाता आले नाही. याच ठिकाणी आजूबाजूला थांबलेले आणखी दोघे त्यांचेवर आले. या चौघांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्या हातातील बॅग हिसकावून कपिलतीर्थ मार्केटच्या दिशेने कारमधून पलायन केले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून भवनमधील पाणी सोडण्यास गेलेला वॉचमन दिलीप कुडाळकर धावत बाहेर आले. यावेळी चौघ लुटारु एका फिरस्त्या महिलेला धक्का देवून गेले. भवनमधील कुत्रेही या चोरट्यांच्या मागे लागले. लुटारुंनी पलायन केल्यानंतर मेहता यांनी मोबाईलवरुन मित्राला माहिती दिली.

बॅगेमध्ये असलेले दागिन्यांचे वर्णन असे :

  1. २ लाख ५७ हजार ६८५ किंमतीचा साडेआठ तोळ्याच्या राजकोट वाट्या.
  2. ५ लाख ९९ हजार ४७१ किंमतीचा २० तोळ्याचा बंगाली हार

 

Web Title: Mumbai's gold jewelery stolen in Kolhapur, 40 lacs gold jewelery worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.