कोल्हापुरात रविवारी ‘सायकलोत्सव’
By Admin | Updated: June 6, 2014 01:38 IST2014-06-06T01:34:41+5:302014-06-06T01:38:46+5:30
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सायकल रॅली

कोल्हापुरात रविवारी ‘सायकलोत्सव’
कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर सायकलिंग क्लबच्या वतीने रविवारी (दि. ८) ‘पॅडल आॅफ फ्युचर व पॅडल फॉर नेचर’ ही संकल्पना रुजविण्यासाठी ‘सायकलोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शहरातील प्रमुख मार्गांवरून ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबच्या वतीने जयेश पाटील व प्रीतेश दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या युगात सर्वांनाच आरोग्याचा आणि प्रदूषणाचा त्रास जाणवू लागला आहे. याबाबत जागृती करण्यासाठी कोल्हापूर सायकलिंग क्लबच्यावतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी आम्ही पर्यावरण दिनानिमित्त या
सायकल रॅलीचे आयोजन केले जाते. गतवर्षी सुमारे ३०० जण सहभागी झाले होते.
दोशी म्हणाले, रविवारी सकाळी अयोध्या पार्क येथे, तसेच ताराराणी चौक येथे ६.३० ते ८.०० या वेळेत नावनोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आठ वाजता शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुहास खामकर यांच्या हस्ते या सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात येईल. रॅलीची सांगता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या ठिकाणी गरीब व गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत २५ सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी आपल्या सायकलीसह या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यावेळी कोल्हापूर सायकलिंग क्लबचे सदस्य राजेश करंदीकर, धीरज शहा, देवीचंद ओसवाल, नितीन केसरकर, इशान कामत, श्रीकांत श्रीखंडे, जयकुमार इंग्रोळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)