कोल्हापूर कडकडीत बंद - बातमीला जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:15+5:302021-05-07T04:25:15+5:30
महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने गुरुवारी जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असलेली सात दुकाने सील केली. लक्ष्मीपुरी येथील गुंदेशा इलेक्ट्रिक गोडावून, छत्रपती शिवाजी ...

कोल्हापूर कडकडीत बंद - बातमीला जोड
महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने गुरुवारी जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असलेली सात दुकाने सील केली. लक्ष्मीपुरी येथील गुंदेशा इलेक्ट्रिक गोडावून, छत्रपती शिवाजी चौक येथील आहुजा दुकान, वणकुद्रे भांडी दुकान, पद्मा टॉकीज येथील वजनमापे दुकान, लक्ष्मीरोड येथील रियल बॉईज दुकान, मॅजिक कलेक्शन, महावीर कॉलेज चौक येथील सद्गुरू टुर्स ॲन्ड झेरॉक्स दुकान यांचा कारवाई झालेल्यांत समावेश आहे.
या विभागाने आतापर्यंत २० दुकानांवर सीलबंदची कारवाई केली आहे. कारवाईत इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर, निरीक्षक रवींद्र पोवार, सहायक आरोग्य निरीक्षक गीता लखन, नीलेश कदम, दिलीप कदम यांनी भाग घेतला.
- वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे आदी अधिकारी गुरुवारी रस्त्यावर उतरले होते.