शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ऊस वाहतूक रोखली, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:01 IST

ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

ठळक मुद्दे

कोल्हापूर - ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. संघटना 3300 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने शेतकऱ्यानी रात्री उशीरा अडवली. ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. मात्र भोगावती परिसरात संताजी घोरपडे कारखान्याच्या तोडी सुरू आहेत. शुक्रवारी रात्री या कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवत काही वाहनांची तोडफोडही केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून बाचणी येथून संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू आहे. या कारखान्याच्या ऊस तोडी बाचणी परिसरात सुरू असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. ऊस भरून रोज रात्री वाहने घोरपडे कारखान्याला जात असतानाच शुक्रवारी (27 ऑक्टोबर )मध्यरात्री अचानक परिते ता. करवीर येथील शेळेवाडी फाट्यावर ऊस भरून जाणाऱ्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली.संघटनेचे कार्यकर्ते दबा धरून बसले होते. ऊस दराची कोंडी जो पर्यत फोडत नाही तो पर्यत कारखाने सुरू करू नये, या शेतकरी संघटनेच्या या इशाऱ्याला न घाबरता घोरपडे कारखाना प्रशासनाने उस वाहतूक सुरूच ठेवली होती. चालू गळीत हंगामातील ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी परिते येथून पडली आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. परिते येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर अडवून त्याची हवा सोडून वाहतूक बंद करण्यात आली. तसेच हेडलाईट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.या घटनेनंतर या मार्गावरुन सुरू असणारी ऊस वाहतूक ठप्प झाली. रात्री उशीरापर्यंत स्वाभिमानीचे कार्यकर्ते येथे थांबून होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय कोणीही ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करत सर्वच कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने अडवणार असून ऊस उत्पादकांनी नुकसान टाळण्यासाठी ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन केले.या आंदोलनात युवक अध्यक्ष जर्नादन पाटील, रावसाहेब डोंगळे, रंगराव पाटील, मानाजी पाटील, मनोज पाटील, रंगराव पाटील, सात्ताप्पा पाटील, बाबासो पाटील, रोहित पाटील, सुभाष पाटील, मानाजी पाटील , तानाजी बस्तवाडे या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर