‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:16 AM2017-10-28T01:16:06+5:302017-10-28T01:17:27+5:30

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे.

The demand for 3300 for 'Swabhimani' - the meeting of the Union Council of Ministers on Thursday, | ‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

Next
ठळक मुद्दे या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला.यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे.गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. मागणी कितीही असली तरी खासदार राजू शेट्टी तडजोड कितीवर करतात आणि एफआरपीपेक्षा किती रक्कम जास्त द्यावी लागणार, ती एफआरपीसोबत की काही मुदतीनंतर द्यावी लागणार हाच कळीचा मुद्दा आहे. यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या आधीही कारखानदारांसमवेत बैठक घेऊन चर्चा करायची तयारी दर्शवली होती; परंतु संघटना व कारखानदार यांना एकत्र आणण्यास कुणीच पुढाकार घेतला नाही. सरकार म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गतवर्षी ऊसदरात पुढाकार घेतला होता; परंतु यंदा शेट्टी भाजपावर देशभर फिरून टीकेचा भडिमार करीत असल्याने पालकमंत्र्यांनी या प्रश्नात अजून तरी लक्ष घातलेले नाही.

उलट पहिली उचल एफआरपीनुसार व अंतिम दर ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखाने देत असताना आंदोलनाची गरज नाही, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांत चर्चाच होऊ शकलेली नाही. परिणामी, पहिल्या उचलीचा तिढा सुटल्यशिवाय स्वाभिमानी धुराडी पेटवू देणार नाही. त्यामुळे हंगाम सुरळीत व्हायला पहिला आठवडा जाणार आहे.गतवर्षी स्वाभिमानीने पहिली उचल ३२०० रुपये मागितली व एफआरपी आणि त्यासोबतच १७५ रुपये जादा देण्यावर तडजोड झाली. या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला. याचा अर्थ स्वाभिमानीने मागणी केलेल्या उचलीपेक्षा हुतात्माने टनांस १५० रुपये जास्त दिले आहेत. यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे. गतवर्षीच्या तुलनेत दर चांगला असल्याने पहिली उचल वाढवून मागण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने टनास ३५०० रुपयांची मागणी केली आहे. त्यांची मागणी प्रतिवर्षीच सर्वांत जास्त असते.

मागच्या हंगामातील अंतिम दर अजून निश्चित झालेले नाहीत. काही कारखान्यांनी साखरेचा दर कमी दाखविल्याने ऊसदर नियंत्रण समितीच्या २० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत संघटनेच्या नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्यावर साखर आयुक्त कार्यालयानेच साखर दराबाबत खात्री करावी, असे ठरल्याने त्या बैठकीत कारखान्यांच्या अंतिम दराचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले नव्हते. ही बैठक हंगाम संपण्यापूर्वी घ्यावी असे ठरले होते; परंतु ती अजून झाली नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.

दृष्टिक्षेपात हंगाम
सन २०१७-१८ या गाळप हंगामात अंदाजे नऊ लाख हेक्टर उसाची लागवड असून, ७२२ लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे, तर ७३.४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या गाळपाच्या तुलनेत सन २०१७-१८ मध्ये ९४ टक्के वाढ अपेक्षित आहे. या हंगामात राज्यात १७० कारखाने सुरू होणार असल्याची माहिती मंत्री समितीने दिली आहे. यंदा परतीचा पाऊस सगळीकडे आॅक्टोबर अखेरपर्यंत झाल्यामुळे ऊस पिकास तो पोषक ठरला आहे. त्यामुळेही उत्पादन वाढणार आहे.

साखरेचे संभाव्य मूल्यांकन असे :
बाजारातील साखरेचा क्विंटलचा दर रु. ३५००
त्याच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध : २९७५
त्यातून एफआरपीसह विविध कर्जांच्या व्याजापोटी ५०० रुपये कपात
कारखान्यांना अनुषंगिक कामासाठी टनास २५० रुपये देणार
निव्वळ उसासाठी उपलब्ध : २२२५ रुपये
कोल्हापूर जिल्ह्णातील सरासरी एफआरपी : २८०० रुपये
ज्या कारखान्यांचे कर्ज कमी आहे त्यांच्या व्याजापोटी ३०० रुपये गेल्यास ऊस बिलासाठी २०० रुपये जादा उपलब्ध
ही रक्कम दहा उताºयाची आहे. हंगाम पुढे जाईल तसा उतारा वाढेल तेव्हा ही रक्कम वाढू शकते.

Web Title: The demand for 3300 for 'Swabhimani' - the meeting of the Union Council of Ministers on Thursday,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.