शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

कोल्हापूर :  प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखा, एकटी संस्थेचे प्रदूषण नियंत्रण मंडळास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 5:53 PM

कोल्हापूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुळे कचऱ्यांची समस्या निर्माण होत आहे. डंपिग ग्राउंडवर सध्या जात असलेल्या कचऱ्यांचे वर्गीकरण केले जात नसून त्यामुळे डंपिग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग झाले आहेत. हा कचरा प्लास्टिकसह जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखाएकटी संस्थेचे प्रदूषण नियंत्रण मंडळास निवेदन

कोल्हापूर : शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुळे कचऱ्यांची समस्या निर्माण होत आहे. डंपिग ग्राउंडवर सध्या जात असलेल्या कचऱ्यांचे वर्गीकरण केले जात नसून त्यामुळे डंपिग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग झाले आहेत. हा कचरा प्लास्टिकसह जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. कचऱ्यांचे वर्गीकरण आवश्यक आहे. त्याबाबत संबंधित शासकीय विभागांना सूचना देऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी एकटी संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी रा. सा. कामत यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महापालिका व एकटी संस्थेच्या समन्वयाने गेल्या सात महिन्यांपासून शहरातील कमर्शियल आस्थापनांमधील कचरा विलगीकरणाचे काम सातत्यपूर्ण सुरू आहे. प्रभागातील काम करताना सुक्या कचऱ्यांमध्ये ७५ टक्के प्रमाण हे निरूपयोगी प्लास्टिकचे असून या प्लास्टिकचा पुर्नवापर होत नाही, त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

दि. ८ एप्रिल २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा तसेच इतर घटकांचे विलगीकरण करून शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण आवश्यक आहे; परंतु शहरात तसे होत नसल्याने डंपिंग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग बनत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, मीरा माने, पुष्पा सुतार, अनुसया शिंदे, पार्वती कांबळे, शालाबाई शिंदे, सारिका भोरे, सोनाबाई शिंदे, जैनुद्दीन पन्हाळकर, सविता कांबळे, वनिता कांबळे, राहुल संकपाळ, मनिषा कुरणे, मनिषा पोटे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर