शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर- तर प्रत्येक मंत्र्यांच्या वाट्याला ‘दगड’, खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीचं राजू शेट्टींकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 18:12 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा व्यक्ती व्देषातून नव्हेतर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

ठळक मुद्देसदाभाऊंची औकात तर काय? : राजू शेट्टीतुमची प्रतिमा तपासा : राजू शेट्टीशेतकऱ्यांच्या रोषाचे प्रत्यंतर

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा व्यक्तीव्देषातून नव्हेतर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे असताना कोणी सरकारचे गुणगान गात असेल तर अशा मंत्र्याचे स्वागत कसे करायचे? असा सवालही त्यांनी केला.माढा मतदारसंघात शनिवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्याचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटले आहेत. व्यक्ती व्देषातून हल्ला केल्याचा खोत यांचा आरोप खोडून काढत खासदार शेट्टी म्हणाले, सरकारच्या भूमिकेने शेतकरी हैराण झाला आहे.

ऊस उत्पादकांमध्ये कमालीचा असंतोष असून त्या रोषाचे प्रत्यंतर खोत यांना आले आहे. आतापर्यंत शेतकरी शांत होता, आता त्याचा राग बाहेर पडत आहे. आज खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली, ही परिस्थिती सुधारली नाहीतर राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या वाट्याला दगड येतील, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे.सदाभाऊंची औकात तर काय?ऊस दराच्या पहिल्या उचलीवरून सध्या पेच निर्माण झाला आहे. याबाबत विचारले असता, ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची औकात व कुवत नसल्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

तुमची प्रतिमा तपासा‘स्वाभिमानी’च्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका काही मंडळी करत आहेत, पण आमच्या पायाखालची वाळू सरकली की नाही, यापेक्षा समाजातील तुमची प्रतिमा तपासा, असा टोलाही शेट्टी यांनी राज्यमंत्री खोत यांना लगावला. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत