कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 12:29 PM2018-02-24T12:29:08+5:302018-02-24T12:29:08+5:30

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

State Minister Sadabhau Khots stone pellet issue in solapur | कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक

Next

सोलापूर : स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत सदाभाऊ खोत यांची कार फोडण्यात आली. कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळील ही घटना आहे. दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या समस्येत वाढ होत असताना, राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्‍महत्या करत असल्याच्या अशा विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 

शिवाय, खोत यांना काळे झेंडे दाखवून त्यावर गाजर, तूर व मका फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे.  प्रत्येकवर्षी ऊस आंदोलने जोरात करणारे सदाभाऊ या वर्षी ऊस कारखानदारांनी एकी करून पहिली उचल कमी दिली तरीही याविरोधात त्यांनी तोंड उघडले नाही, शेतक-यांची हमीभाव योजना व्यवस्थित राबवली नाही, शासनाने जाहीर केलेली कर्ज माफी योजना फसवी झालेली आहे. याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, प्रसिद्धी प्रमुख सत्यवान गायकवाड, कार्याध्यक्ष महावीर सावळे, शाखाध्यक्ष मुसा शेख आदी उपस्थित होते. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याप्रकरणी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 

Web Title: State Minister Sadabhau Khots stone pellet issue in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.