Sangli: Statue of Sadhau's car rammed, Raju Shetty's statue burned | सांगली : सदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तर, राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळला
सांगली : सदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तर, राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळला

ठळक मुद्देसदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तरइस्लामपुरात राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळलास्वाभिमानीचे कार्यालय फोडले, रयत संघटनेचे कार्यकर्ते संतप्त

इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली, याला प्रत्युत्तर म्हणून वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात शिवाजी पुतळ्यासमोर खासदार राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर जवळच असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर जाऊन मोडतोड केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर सोलापूरजवळ सकाळी दगडफेक केली. या दगडफेकीत सदाभाऊ खोत यांची कार फोडण्यात आली. कुडूर्वाडीजवळील रिधोर गावाजवळील ही घटना आहे. खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून त्यावर गाजर, तूर व मका फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.

पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दरम्यान, मंत्री खोत यांच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत खासदार शेट्टी यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
 


Web Title: Sangli: Statue of Sadhau's car rammed, Raju Shetty's statue burned
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.