शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

कोल्हापूर : चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ लिहून फिरणाऱ्यास अटक, संशयित देवाळेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:23 IST

चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

ठळक मुद्देचोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ लिहून फिरणाऱ्यास अटकसंशयित देवाळेतील

कोल्हापूर : चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली.सतीश दिगंबर कांबळे (वय ३३, देवाळे, ता. करवीर) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. त्याने या दुचाकीवर ‘पोलीस’ असे लिहिले होते. त्याने चोरीच्या दुचाकीवर पुढील बाजूच्या हेडलाईटवर व पाठीमागील पंख्यावर ‘पोलीस’ असे लिहिले आहे.

त्यामुळे त्याने पोलीस असल्याचा बहाणा करून लोकांची फसवणूक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास संबंधितांनी या संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त घालत होते. यावेळी एकजण दुचाकीवर ‘पोलीस’ असे लिहून कावळा नाका चौकाकडून धैर्यप्रसाद चौकाकडे जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सदर बझार येथे पकडले. त्याने सतीश कांबळे असे नाव सांगितले. त्याच्याकडील दुचाकीचा नंबर खोटा असल्याचे निदर्शनास आले.संशयित सतीश कांबळेने जानेवारी २०१८ मध्ये महालक्ष्मी चेंबर्ससमोरील रस्त्यावर लावलेली दुचाकी बनावट चावी वापरून चोरली होती. त्यानंतर त्याने खरी नंबरप्लेट काढून खोटी नंबरप्लेट लावून फिरत असल्याची कबुली दिली. हा चोरीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांत दाखल आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित, राजेंद्र सानप, हेडकॉन्स्टेबल राजेश आडूळकर, राजेंद्र हांडे, संजय हुंबे, संजय काशीद, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रवींद्र कांबळे, प्रकाश संकपाळ, रमेश डोईफोडे, आदींनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर