चोरट्यांकडून महिलांना मारहाण

By Admin | Published: August 26, 2014 11:16 PM2014-08-26T23:16:57+5:302014-08-26T23:22:34+5:30

कर्जत : तालुक्यातील हिंगणगाव शिवारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यावेळी चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी काही महिलांना मारहाणही केली.

Thieves kill women | चोरट्यांकडून महिलांना मारहाण

चोरट्यांकडून महिलांना मारहाण

googlenewsNext

कर्जत : तालुक्यातील हिंगणगाव शिवारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यावेळी चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी काही महिलांना मारहाणही केली.
चोरट्यांकडे कटावणी
अंबालिका साखर कारखान्यानजीक ही वस्ती आहे. येथील लक्ष्मी साबळे, संजय बिटाळ, दत्तात्रय साबळे यांच्या घराचे दरवाजे तोडून ऐवज लांबविण्यात आला. चोरट्यांच्या हातात कटावणी, खोऱ्याचे दांडे होते, असे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. या घरफोड्यांचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित चिंतले करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)
चोरट्यांची महिलांना जबरदस्तीची धमकी
घरातील किंमती वस्तू, दागिने व रोख रक्कम काढून द्या अन्यथा महिलांवर जबरदस्ती करु, अशी धमकी चोरट्यांनी महिलांना देऊन काही महिलांना मारहाणही केली. लक्ष्मी साबळे या महिलेचे दोन दात चोरट्यांनी पाडले. मीरा बिटाळ या महिलेच्या बालकाला चोरट्यांनी नजीकच्या उसाच्या शेतात फेकून दिले. हा सर्वप्रकार मंगळवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडला.

Web Title: Thieves kill women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.