शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

कोल्हापूर : गर्दीनेच ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ चा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:56 IST

‘तुमचे यश हेच आमचे ध्येय!’ हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी होत असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला कोल्हापुरातील विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने शुक्रवारी प्रारंभ झाला.

ठळक मुद्देगर्दीनेच ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ चा प्रारंभविद्यार्थी, पालकांचा उर्त्स्फूत प्रतिसादकरिअर विषयक अचूक मार्गदर्शन एकाच छताखाली

कोल्हापूर : ‘तुमचे यश हेच आमचे ध्येय!’ हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी होत असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला कोल्हापुरातील विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने शुक्रवारी प्रारंभ झाला.

शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला, सर्वव्यापी उपायांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर’ला पहिल्याच दिवशी उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.

शनिवारी आणि  रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक युनिक अकॅडमी, तर सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह आणि देसाई अकॅडमी आहे.येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनातील या प्रदर्शनाचे उद्घाटन वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, देसाई अकॅडमीचे संचालक महेश देसाई प्रमुख उपस्थित होते. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, उपसरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील यांनी रोप देवून केले.

यावेळी ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, इव्हेंट विभागप्रमुख दीपक मनाठकर उपस्थित होते. सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर प्रमुख उपस्थितांनी ‘लोकमत अ‍ॅस्पायर’ प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ‘लोकमत’ चे शैक्षणिक प्रदर्शन असलेल्या ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून करिअर विषयक माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाल्यापासून विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली.

विविध नामांकित शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत होते. स्टॉलधारक त्यांना माहितीपत्रक, चित्रफितीद्वारे अभ्यासक्रम व आपल्या संस्थेची माहिती देत होते. दहावीचा निकाल दुपारी जाहीर झाल्यानंतर प्रदर्शनातील गर्दीमध्ये वाढ झाली.

प्रदर्शनातून माहिती घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येत होते. दरम्यान, प्रदर्शनातील सायंकाळच्या सत्रात विज्ञानावर आधारित प्रश्नांवरील ‘सायन्स पंडित’ परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागला. देसाई अकॅडमीचे महेश देसाई यांनी बारावी, जेईई, नीट, एनडीए परीक्षेची तयारी याविषयावर मार्गदर्शन केले.

शनिवारी प्रदर्शनात

  1.  सकाळी ११ वाजता : चारूदत्त रणदिवे यांचे मार्गदर्शन (संमोहन व व्यक्तिमत्त्व विकास)
  2.  दुपारी १२ वाजता : डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रो. बी. व्ही. बिराजदार (इंजिनिअरिंग- इट्स ब्रँचेस अ‍ॅँड कॅप अ‍ॅडमिशन प्रोसेस)
  3. दुपारी १ वाजता : साहील चोपडे यांचे मार्गदर्शन (करिअर इन नेव्ही)
  4. दुपारी ४ वाजता : डॉ. जयदीप बागी (होलिस्टिक अ‍ॅप्रोच टुवर्डस एज्युकेशन)
  5. सायंकाळी ५ वाजता : एंट्रन्स टेस्ट फॉर एमबीबीएस- अ‍ॅब्रॉड
  6.  सायंकाळी ६ वाजता : कामेंद्र दहात यांचे मार्गदर्शन (स्टडी अँड वर्क अ‍ॅब्रॉड)

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर