लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर आजपासून

By admin | Published: June 3, 2016 02:53 AM2016-06-03T02:53:38+5:302016-06-03T02:53:38+5:30

लोकमततर्फे आयोजित हीरो मोटो कॉर्प आणि स्नेहा ग्रूप आॅफ एज्युकेशनल इन्टिट्यूशन, ट्रीनिटी युनिव्हर्सिटी व न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने

Lokmat Aspire Education Fair from today | लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर आजपासून

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर आजपासून

Next

शिक्षण व करिअरचे सर्वाेत्तम पर्याय : मिळेल सर्वांगीण सल्ला व सर्वव्यापी उपाय
नागपूर : लोकमततर्फे आयोजित हीरो मोटो कॉर्प आणि स्नेहा ग्रूप आॅफ एज्युकेशनल इन्टिट्यूशन, ट्रीनिटी युनिव्हर्सिटी व न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१६’चे चौथे पर्व शुक्रवार ३ जूनपासून सुरू होत आहे. हॉटेल सेंटर पॉर्इंट रामदासपेठ येथे आयोजित या फेअरचे उद्घाटन दुपारी १ वाजता होईल. याप्रसंगी ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे व आ. अनिल सोले उपस्थित राहतील.
आपल्या पाल्याने कोणता अभ्यासक्रम निवडावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत आहेत. याशिवाय सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी फिरावे लागणार. यात श्रम, वेळ आणि पैसा जाणार. याची दखल घेत ‘लोकमत’ने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे. हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन ३ ते ५ जूनदरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. विशेष म्हणजे या प्रदर्शनात शिक्षणाविषयीच्या अनेक शंकाकुशंकाचे निराकरण करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करतील. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्टपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटेरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन तसेच विविध विद्यापीठे सहभागी असतील.

Web Title: Lokmat Aspire Education Fair from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.