कोल्हापूर : पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाला सुरुवात, विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:29 IST2018-03-16T18:29:41+5:302018-03-16T18:29:41+5:30
‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

कोल्हापुरात पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दसरा चौकातून सुरू झालेल्या जलदिंडीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : ‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या हस्ते जलदिंडीचे पूजन व श्रीफळ वाढवून तिचा प्रारंभ करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामध्ये ‘पाणीबचतीचे महत्त्व’ या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी नंदकुमार काटकर म्हणाले, पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचा योग्य वापर करा. काटकसरीचे धोरण अवलंबा. आज शेती, औद्योगिक अशा क्षेत्रांसाठी पाणी लागते. सध्या पाण्याचे स्रोत कमी होत आहेत; त्यामुळे पाणी जपून वापरा.
कोल्हापुरात पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दसरा चौकातून सुरू झालेल्या जलदिंडीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे धैर्यप्रसाद चौकात येऊन या जलदिंडीची सांगता झाली. जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आर. एम. संकपाळ, कार्यकारी अभियंता किरण पाटील, उपअधीक्षक अभियंता व्ही. आर. पुजारी यांच्यासह या विभागातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. दरम्यान, या सप्ताहाची सांगता गुरुवारी (दि. २२) ताराबाई पार्कमधील सर्किट हाऊसच्या शाहू सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.