शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कसले समाज 'कल्याण'?; तब्बल ८३ कोटींचा निधी अखर्चित

By भीमगोंड देसाई | Updated: February 7, 2025 17:23 IST

जिल्हा नियोजन समिती आराखड्यातील कामे : मार्च अखेर खर्च करण्याची घाई, नवीन ११८ कोटींचा आराखडा

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२४-२५ च्या आराखड्यात अनुसूचित जाती घटक कार्यक्रमातून विविध विकास कामांसाठी समाज कल्याण विभागास मंजूर ३४८ कोटी ६ लाखांपैकी अजून तब्बल ८३ कोटी १३ लाखांचा निधी अखर्चित आहे. मार्च अखेर निधी खर्च करण्याची लगीनघाई सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ८० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, सन २०२५-२६ साठी प्रारूप आराखड्यात समाज कल्याणने ११८ कोटींचा आराखडा तयार केला आहे.समाज कल्याण विभागातर्फे दलित वस्तींमध्ये विकास कामे करणे, वैयक्तिक लाभ देण्याच्या योजना राबवल्या जातात. यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्वतंत्र तरतूद केली जाते. सन २०२४ मध्येही ३७६ कोटींचा आराखडा होता. यापैकी ३४८ कोटीचा निधी मंजूर झाला. यातील अजूनही ८३ कोटींचा निधी अखर्चित आहे. उर्वरित निधी खर्च झाला आहे, पण पहिल्या टप्प्यात शासनाकडून केवळ ३३ टक्केच निधी प्राप्त झाल्याने अखर्चित निधी अधिक असल्याचे दिसते, असे समाज कल्याण प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रमुख विभागनिहाय अखर्चित निधी असा..कृषी व संलग्न सेवा : १ कोटी.क्रीडा व युवक कल्याण : १ कोटी ७५ लाखपशुसंवर्धन : ३ कोटी ९६ लाखसहकार : ५ कोटी १० लाखसामान्य शिक्षण : ५ कोटी ३६ लाखविद्युत विकास : ५ कोटी ८२ लाख

सर्वाधिक शिल्लक जिल्हा परिषद समाज कल्याणचामागासवर्गीय वस्तीगृहांना अनुदान, माध्यमिक शाळांमध्ये शिणाऱ्या मागासगर्वीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, दलित वस्त्यांची सुधारणा, आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती यासाठी उपलब्ध झालेल्या १३६ कोटी ३ लाख निधीपैकी सर्वाधिक २८ कोटी २९ लाख रुपये शिल्लक राहिला आहे. यावरून जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा दिरंगाई कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नव्या आराखड्यात यावर अधिक तरतूद- दलित वस्त्या सुधारणे- साकव बांधणे

अखर्चित निधी मार्च अखेर खर्च करण्याचे नियोजन केले आहे. शिल्लक निधीतील ८० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. - सचिन साळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदfundsनिधी