शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:58 IST

चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.

ठळक मुद्दे लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर  भाजीपाला स्थिर, डाळींची मागणी वाढली

कोल्हापूर : चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.पावसाळ्यासाठी चटणी करण्याकरिता आपल्याकडे साधारणत: मार्च महिन्यापासूनच लगबग सुरू असते. त्यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांत मिरची, मसाला यांसह लसणाचे दर काहीसे चढेच असतात. यंदा मात्र लसणाच्या दरात घसरण थांबलेली नाही.

बाजार समितीत रोज लसणाच्या सातशे ते आठशे पोत्यांची आवक सुरू आहे. त्या प्रमाणात उठाव होत नसल्याने दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात लसूण दहा रुपयांपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत राहिला आहे. तुलनेने कांदा व बटाट्याच्या दरांत चढउतार दिसत नाही.भाजीपाल्याची स्थानिक आवक अजूनही चांगली असल्याने दर स्थिर राहण्यास मदत होत आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, भेंडी, कारली, दोडक्याचे दर गत आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण थोडी थांबली असून, घाऊक बाजारात चांगल्या टोमॅटोच्या दरात थोडी सुधारणा झालेली आहे.

कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, बाजार समितीत रोज २२ हजार पेंढ्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात पाचपासून १७ रुपयांपर्यंत पेंढीचा दर आहे. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांचे दर स्थिर असून, पेंढीचा दर सरासरी दहा रुपये आहे.सध्या पावसाळ्याकरिता डाळींचा साठा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे डाळींचा उठाव होत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत तूरडाळ व हरभरा डाळीचे दर फारच कमी आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो ६५ रुपये, तर हरभराडाळ ४९ रुपयांपर्यंत आहे.

शाबू, रवा, मैदा, ज्वारीसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली असून ते ८५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या दरात फारसा फरक दिसत नाही.

हापूस सामान्यांच्या आवाक्यात!कोकणासह कर्नाटक, गुजरातमधून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे हापूस आंबा सामान्य माणसाच्या आवाक्यात आला असून, हंगामाच्या शेवटी-शेवटी का असेना, त्याची चव चाखायला मिळत आहे. कलिंगडांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून पावसामुळे त्यांची गोडी कमी झाली आहे.

 

हापूस आंब्यांची आवक अजून पंधरा दिवस अशीच राहील. दरात चढउतार असला तरी चांगल्या आंब्याचे दर २०० ते ६०० रुपये डझन अजूनही आहेत.- सलीम बागवान, फळांचे व्यापारी, बाजार समिती 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरMangoआंबा