शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

कोल्हापूर : तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा पडदा २१ रोजी उघडणार, अभिनेते सागर तळाशीकर उद्घाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:13 IST

कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत साजरा होणाऱ्या तिसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचा पडदा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते होणार असून महानगरपालिकेच्या सर्व ६0 शाळा सहभागी होणार आहेत. यंदा बाल चित्रपट महोत्सवाचे शताब्दी वर्ष आहे.

ठळक मुद्देतिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा पडदा २१ रोजी उघडणारअभिनेते सागर तळाशीकर उद्घाटककोल्हापूर महापालिकेतील ६0 शाळांचा सहभाग

कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत साजरा होणाऱ्या तिसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचा पडदा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते होणार असून महानगरपालिकेच्या सर्व ६0 शाळा सहभागी होणार आहेत. यंदा बाल चित्रपट महोत्सवाचे शताब्दी वर्ष आहे.

चिल्लर पार्टीच्या वतीने महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तोमोत्तम चित्रपट दाखविले जातात. समाजातील जागरुक पालकांची मुलं या उपक्रमाला उपस्थित असतात, परंतु ज्यांना रोजच्या रोजीरोटीची चिंता आहे, अशा कुटुंबातील मुलांपर्यंत बालचित्रपट पोहोचविण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे महोत्सवाचे आयोजन करते. यंदा केवळ महानगरपालिकेच्या ६0 शाळांमधील विद्यार्थीच या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवातील सहा चित्रपटांचा आस्वाद घेणार आहेत.या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९. ३0 वाजता शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरचे सुपुत्र अभिनेते सागर तळाशीकर यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण सभापती वनिता देठे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.बालचित्रपटाचे शताब्दी वर्ष१९१८ मध्ये रशियात गार्लिन या रशियन कथाकाराच्या कथेवर आधारित ' सिग्नल ' हा जगातील पहिला बालचित्रपट प्रदर्शित झाला. २0१८ हे वर्ष बाल चित्रपटाचे शताब्दी वर्ष आहे, म्हणूनही या महोत्सवाला विशेष महत्व आहे.

 

पतंग उडविणाऱ्या मुलीचा विशेष लोगोया बालमहोत्सवासाठी विशेष लोगो तयार करण्यात आला आहे. उंच आकाशात हवेच्या झोताबरोबर विहरणारा पतंग आपल्याला मुक्तपणानं जगायला शिकवतो. त्याचं आकाशात उंच जाणं यशाचा मार्ग दाखवणारं असतं, तर उंचावरून जमिनीकडे गतीने येणारी त्याची गोत धाडस शिकवून जाते आणि हे सारं करताना त्याच्याजवळ अगोदरच ठरवलेली काही कारणं नसतात. असतो तो फक्त अवखळपणा. याचे प्रतिबिंंब दाखविणारा विशेष लोगो चिल्लर पार्टीतर्फे तयार करण्यात आला आहे. यात लहान निरागस, आणि अल्लड मुलगी पतंग उडविताना दर्शविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणkolhapurकोल्हापूर