शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रिक्षावाल्याला आत्मविश्वास नडला अन् अपघात घडला; रिक्षा-बसच्या समोरासमोर धडकेत तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:16 IST

एसटी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले

हातकणंगले : कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर एस. टी. बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता हंसराज खत्री (३०) आणि श्रीतेज विलासराव जंगम (१०, रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. रिक्षाचालक आणि सहा वर्षांच्या मुलासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.इचलकरंजी येथील शिवानी खत्री आणि त्यांचे कुटुंब प्रशांत पेटकर (रा. इचलकरंजी) यांच्या रिक्षाने क्र. (एमएच ०९, जे ८९८९) रामलिंग आणि धुळोबा देवदर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर त्यांच्या रिक्षाला कोल्हापूरकडून येणाऱ्या कुडाळ ते पंढरपूर एस. टी. बस क्र. (एमएच १४ बीटी २५०९)ने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील शिवानी खत्री आणि त्यांच्या शेजारी राहणारा रितेश जंगम हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षाचालक प्रशांत पेटकर व रिक्षातील कियान घेवरचंद खत्री (वय ६), ललिता हंसराज खत्री (वय ४०) हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातस्थळी स्थानिक नागरिक आणि स्वप्नील नरुटे यांनी तत्काळ मदत केल्याने तसेच पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. एसटी बसचालक रवींद्र प्रभाकर चव्हाण (रा. पंढरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आत्मविश्वास नडलासमोरून भरधाव एस. टी. बस येत असल्याचे बघूनही माझी रिक्षा रस्ता ओलांडेल, हा आत्मविश्वास रिक्षावाल्याला नडला आणि अपघात घडला. खत्री कुटुंबाचे इचलकरंजी येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. शिवानी खत्री या पतीला मदत करत होत्या. देवदर्शनासाठी त्या बाहेर पडल्या आणि काळाने डाव साधला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू