शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोल्हापूर : देशभर उसळलेल्या दंगली अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांकडूनच, प्रकाश आंबेडकर : वाद दलित, मराठा यांच्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:57 PM

कोरेगाव भीमा घटनेनंतर उसळलेल्या दंगली या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांकडून घडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हा वाद दलित आणि मराठा यांच्यात नसून, देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यावरून हिंदुत्ववाद्यांत अनियंत्रित आणि नियंत्रित असे दोन गट निर्माण झाले असून त्यातूनच या घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देचौकशी आयोगाचा न्यायमूर्ती ‘रबर स्टँप’ नसावाअन्यथा आम्हीच बंदोबस्त करतोदेशात यादवीची शक्यता

कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेनंतर उसळलेल्या दंगली या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांकडून घडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

हा वाद दलित आणि मराठा यांच्यात नसून, देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यावरून हिंदुत्ववाद्यांत अनियंत्रित आणि नियंत्रित असे दोन गट निर्माण झाले असून त्यातूनच या घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर दि. ३ जानेवारीला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवेळी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

ते सकाळी कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात भेट देणार होते; पण पोलिसांच्या आवाहनानुसार त्यांनी शासकीय विश्रामगृहावरच संघटनेच्या कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथे चाकण आणि शिरूर मार्गावरून येणाऱ्या भीमसैनिकांना मारहाण केली. त्याबाबत या भीमसैनिकांना का मारले? याचे शासनाने उत्तरही दिलेले नाही अगर त्याबाबत गुन्हाही नोंदवून घेतलेला नाही.

तोच राग दुसऱ्या दिवशी गावा-गावांतून बाहेर पडला. त्यानंतर दि. ३ जानेवारीला पुकारलेला महाराष्ट्र बंद शांततेत झाला. काही ठिकाणी हिंसक वळणचे गालबोट लागले; पण ते कृत्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी जाणीवपूर्वक केले आहे. त्याबाबत उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.‘महाराष्ट्र बंद’वेळी झालेल्या दंगलीवेळी पोलिसांनी काहीजणांवर दरोडेखोराचे, तर काहीजणांवर ३०७ कलम लावणे हा आतताईपणा आहे; पण त्यांतील अटक केलेल्यांची न्यायालयामार्फत आम्ही सुटका करून घेऊ, असेही ते म्हणाले.चौकशी आयोगाचा न्यायमूर्ती ‘रबर स्टँप’ नसावासंपूर्ण देशभरात निर्माण झालेले गैरविश्वासाचे वातावरण शासनाने प्रथम थांबवावे. या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती जो न्यायाधीश नियुक्त करतील, तो आम्हाला मान्य असेल; पण तोे दलित नसावा, कार्यरत असावा. तो कोणाच्या दबावाखाली ‘रबर स्टँप’म्हणून राहणार नाही याची दक्षता घेऊ, असेही ते म्हणाले.अन्यथा आम्हीच बंदोबस्त करतोभारताचा पाकिस्तान होऊ नये यासाठी देशातील हिंदुत्ववादी संघटनांतील अंतर्गत वादातून निर्माण होणाºया हाफीज सय्यदना शासनाने वेळीच पायबंद घालावा. जर शासनाने त्यांचा बंदोबस्त केला नाही, तर आम्हीच जनतेला आवाहन करून त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.देशात यादवीची शक्यतादेशापुढे आज मोठे संकट उभे आहे. त्यातून यादवी होण्याची शक्यता आहे. १ जानेवारी रोजी गाड्या जाळणं यालाच मी त्याची नांदी समजतो, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. नियंत्रित आणि अनियंत्रित हिंदू संघटनांच्या सहभागी वादातून हिंसक घटना घडल्या. अशा घटनेवेळी आतताईपणा केला तर त्याचा फटका निवडणुकीत बसतो याची जाणीव नियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांंना असल्याने ते मर्यादा राखून आपला अजेंडा पुढे नेतात.‘पेपर टायगर’रामदास आठवले यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, मी यापूर्वी राजा होतो, आताही आहे अणि पुढेही राजाच असेन. ‘ते’ पेपर टायगर आहेत, त्यांना मीडियाने मोठे केले आहे. त्यांना तुमच्याजवळ ठेवा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरkolhapurकोल्हापूरBhima-koregaonभीमा-कोरेगाव