शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वसुली, दाखले, सातबाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम: चावड्यांवरील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 11:31 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोतवालांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा हा परिणाम आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही शासनाकडून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे.

ठळक मुद्देवसुली, दाखले, सातबाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम: चावड्यांवरील चित्र कोतवालांच्या धरणे आंदोलनाचा फटका, आंदोलन सुरूच : समरजितसिंह घाटगे यांची भेट

कोल्हापूर : जिल्ह्यातील चावड्यांवर महसूल वसुली, विविध प्रकारचे दाखले, सातबारे, दफ्तर ने-आण करणे, विविध शासकीय विभागांच्या नोटिसा बजावणे अशी विविध प्रकारची कामे ठप्प आहेत. गेल्या ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोतवालांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा हा परिणाम आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही शासनाकडून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे.सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४५४ कोतवाल काम बंद करून सहभागी झाल्याने जिल्ह्यातील चावड्यांवरील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.सर्वच कामांसाठी कोतवाल हा महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे; परंतु त्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. याचा परिणाम म्हणजे गाव पातळीवर चावड्यांमधून होणारी महसूल वसुली, शिक्षण कर, जमीन कर, बिगर शेती कर, गौण खनिज कर वसुली, विविध प्रकारचे दाखले, सातबारा, दफ्तरांची ने-आण करणे, शासनाच्या विविध विभागांच्या नोटिसा संबंधितांना बजावणे, निवडणूक प्रक्रियेत मदत, अशा विविध कामांवर झाला आहे.

गेल्या ११ दिवसांपासून ही कामे पूर्णपणे ठप्प आहेत. कडाक्याच्या थंडीतही कोतवालांनी हे आंदोलन ताकदीने सुरू ठेवले आहे. शासनाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तरीही जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत येथून न उठण्याचा त्यांचा निर्धार आहे.दरम्यान, सोमवारी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. कोतवालांच्या मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर