कोल्हापूर : स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद, भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:07 IST2018-04-02T18:07:58+5:302018-04-02T18:07:58+5:30

कोल्हापूर येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या ‘श्वेतबंध’ या चित्रप्रदर्शनाला सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीज येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले.

Kolhapur: In response to Bharti Jadhav's inauguration by Swapnil Patil | कोल्हापूर : स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद, भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या मुंबईतील चित्रप्रदर्शनाला सोमवारी अभिनेते भरत जाधव यांनी भेट दिली. यावेळी स्वप्निल पाटील,अजय कुरणे उपस्थित होते.

ठळक मुद्दे स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसादभरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन पहिल्याच दिवशी रसिकांची गर्दी

कोल्हापूर : येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या ‘श्वेतबंध’ या चित्रप्रदर्शनाला सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीज येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या मुंबईतील चित्रप्रदर्शनाला सोमवारी अनेकांनी भेट दिली.


कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या मुंबईतील चित्रप्रदर्शनाला सोमवारी अनेकांनी भेट दिली.

जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये ८ एप्रिलपर्यंत या प्रदर्शनाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. स्वप्निल यांचे हे सहावे चित्रप्रदर्शन आहे. या चित्रप्रदर्शनात ३० तैलरंगातील चित्रांचा समावेश आहे.

मीही कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरच्या कलाकाराचे प्रदर्शन मुंबईत भरते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आयुष्यभर सूर्यासारख्या या कलेच्या क्षेत्रात प्रकाशमय राहो, अशा शुभेच्छा यावेळी उद्घाटन समारंभात अभिनेते भरत जाधव यांनी स्वप्निल पाटील यांना दिल्या.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, दिग्दर्शक अजय कुरणे, इनायत शिडवकर, बी. एस. पाटील, सुनीता पाटील, सुवर्णा चरापले, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

मूळचे करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्वप्निल पाटील यांनी ‘लोकमत’आयोजित श्लोक प्रदर्शनासह अन्य विविध ठिकाणी पुरस्कार मिळविलेले आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: In response to Bharti Jadhav's inauguration by Swapnil Patil