शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:06 IST

पूरग्रस्तांना सध्या काय हवे.. वाचा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या वेळी महापुराचे संकट आले, त्या त्या वेळी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याने मिठाच्या पुड्यापासून ते कपड्यांपर्यंत सगळी मदत केली. जात, पात, धर्म अन प्रादेशिक अस्मितेच्या भिंती ढासळत माणुसकीसाठी धावलेली ही मदत कोल्हापूरकरांनी त्यांच्या हृदयात ठेवली. आज तोच मराठवाडा अन् सोलापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात अडकल्यानंतर कोल्हापूरकरांनी दातृत्वाची ओंजळ रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.लोकप्रतिनिधींपासून सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विविध संघटनांनी मदतीचा ओघ सुरू केल्याने 'कोणती ना जात ज्यांची कोणती ना धर्म ज्यांना.. दुःख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना! मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना..’ या काव्यपंक्तीची प्रचिती कोल्हापूरकरांनी दिली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २००५, २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरावेळी जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, कपडे व औषधी साहित्याची मदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे तिकडील शाळा, कॉलेजमधूनही पै-पै गोळा करून कोल्हापूरकरांना मदतीचा हात दिला होता. ती जाणीव ठेवून कोल्हापूरकरांनी आता त्याच मदतीचे पांग फेडण्यासाठी धाराशिव, बीड, जालना, परभणी, लातूर व सोलापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेस म्हणते, आता हीच वेळ मदतीचीमराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना आवाहन केले आहे. किराणा सामान, प्रथमोपचारांचे साहित्य, पाणी बाटल्या, सॅनिटरी पॅड्स, शालेय साहित्य देऊन पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया. ही मदत येत्या २४ ते २८ सप्टेंबरपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीत जमा करण्यात येणार असून, ती २९ सप्टेंबरला ट्रकद्वारे पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे.

अमल महाडिक करणार मदतकोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनीही पूरग्रस्तांना मदतीचे पूर्ण किट देण्याची तयारी चालवली आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही मदत पाठवण्यात येणार आहे.

जिल्हा आपत्ती कक्षाला कॉल, आम्हाला मदत करायची आहेमराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी कोल्हापूरकरांकडून गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला जात आहे. मात्र, ही मदत सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातच स्वीकारली जात आहे.पूरग्रस्तांना सध्या काय हवे..पूरग्रस्तांचे अन्नधान्य व कपडे पूर्णपणे वाहून गेल्याने सध्या येथे साखर, तांदूळ, गहू, ज्वारी, मसाल्याचे पदार्थ यांसह अन्नधान्य व कपड्यांची नितांत गरज आहे. अनेक मुलांचे शैक्षणिक साहित्य महापुरात वाहून गेले आहे, भिजून खराब झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याचीही मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur extends helping hand to flood-hit Marathwada, Solapur.

Web Summary : Kolhapur rallies to aid flood-stricken Marathwada and Solapur, reciprocating past support. Locals, organizations donate food, clothes, and school supplies, driven by compassion and gratitude.