शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या रेल्वे समस्या मार्गी लावू, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:52 IST

महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनने घेतली भेट

कोल्हापूर : महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुहास गुरव आणि उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी रविवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी कोल्हापूर दौऱ्यात कोल्हापूरच्या रेल्वे प्रवासी सेवेतील सुधारणांबाबत चर्चा केली. वंदे भारत रेल्वे कोल्हापुरातून लवकरच मार्गस्थ होईल, असेही आश्वासन दानवे यांनी यावेळी दिले.रेल्वे राज्यमंत्री दानवे रविवारी कोल्हापुरात होते. यावेळी महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुहास गुरव आणि उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापुरातील रेल्वे प्रवासी सेवेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर स्टेट रेल्वे या नावाने १८९१ मध्ये कोल्हापूर संस्थानच्या खर्चाने उभारून कोल्हापूर ते मिरज मीटर गेज रेल्वेमार्गाची उभारणी केली, त्यामुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक, औद्याेगिक, कृषी उद्योग, व्यापार व्यवसायाच्या विकासाचे नवे महाद्वार खुले झाले. त्यामुळे सध्या या स्थानकाच्या विस्तारीकरणाचे संथ काम लवकर पूर्ण करावे, कोविड काळात रद्द केलेली कोल्हापूर ते मुंबई ही सह्याद्री एक्स्प्रेस गाडी सध्या पुण्यापर्यंत धावते. जूनमध्ये मुंबईच्या सीएसटीचे प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण होत आहे, त्या वेळेपर्यंत ती पूर्ववत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरू करावी, कोल्हापूर ते मुंबई मार्गावर बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेस सत्वर सुरू करावी, या गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घाटन आपल्या हस्ते करावे, कोल्हापूर ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या मिरज ते कुर्डूवाडी मार्गे धावणारी द्विसाप्ताहिक रेल्वे रोज सोडावी, सांगली मिरज, परळी, वैजनाथ या गाडीचा प्रवास रात्रीचा असून त्याला किमान ६ शयनयान डबे जोडावेत, यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार आहे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन दानवे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे