कोल्हापूर हादरले, ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 20:22 IST2021-04-19T20:20:53+5:302021-04-19T20:22:00+5:30
Coronavirus Kolhapur- गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग हादरला आहे. तर नवे ४३१ रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीपासून आतापर्यंतच्या कोरोनाच्या एका दिवसांच्या मृतांच्या संख्येतील ही उच्चांकी संख्या आहे. त्यामुळे जिल्हयातील परिस्थिती यापुढच्या काळात अधिक गंभीर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूर हादरले, ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
कोल्हापूर - गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग हादरला आहे. तर नवे ४३१ रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीपासून आतापर्यंतच्या कोरोनाच्या एका दिवसांच्या मृतांच्या संख्येतील ही उच्चांकी संख्या आहे. त्यामुळे जिल्हयातील परिस्थिती यापुढच्या काळात अधिक गंभीर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, रविवारी रुग्ण आणि बळींच्या संख्येने दुसऱ्या लाटेतील उच्चांक केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. नवे ४३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, बळींच्या संख्याही ३४ वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी झाली आहे. सलग ४३१ रुग्ण सापडल्याने आरोग्य व प्रशासन यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने लॉकडाऊन कडक झाल्याने नागरिक बऱ्यापैकी घरात बंद झाले आहेत. तरीदेखील संसर्गाचा वाढणारा आकडा उरात धडकी भरवणारा ठरत आहे.
शनिवारी ५९१ रुग्ण आढळले होते. यात रविवारी आणखी तिघांची भर पडली. मृत्यूही गेल्या दोन दिवसांपासून १२ होते, त्यात रविवारी तिघांची भर पडून ती १५ वर गेली. विशेष म्हणजे रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज होणारी संख्याही कमी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने चिंता आणखी वाढली असून, आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे.