शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस संरक्षणात कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा

By संदीप आडनाईक | Updated: February 25, 2025 22:07 IST

Kolhapur News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा मंगळवारीही ठप्पच होती. राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे प्रत्येक बसमागे पोलिस संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- संदीप आडनाईक कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा मंगळवारीही ठप्पच होती. राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे प्रत्येक बसमागे पोलिस संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची या परिस्थितीसंदर्भात आणि बससेवा तातडीने सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांत सुरळीत करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाच्या चालकास कन्नड भाषा येत नसल्यामुळे दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात मारहाण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील आंदोलकांनी कर्नाटकातून येणाऱ्या बसेसना काळे फासले. या प्रकारामुळे राज्यात वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रातून दरदिवशी सुमारे ८६ बसेस कर्नाटकात जातात आणि कर्नाटकातूनही तितक्याच बसेस महाराष्ट्रात येत असतात. या सर्व बसेस कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर कोगनोळी नाक्यावर रोखलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यादरम्यानची सार्वजनिक बस सेवा ठप्पच आहे. याचा फटका दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसला आहे.

दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली चर्चादरम्यान या विषयावर मंगळवारी दुपारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ऑनलाईन चर्चा केली. यात दोन दिवसात बससेवा सुरळीत करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत दोन्ही राज्यांच्या बस गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक