कोल्हापूर : मदरसा आधुनिकीकरणासाठी १४ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव द्या : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:29 IST2018-07-31T13:11:23+5:302018-07-31T13:29:40+5:30
मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, तसेच शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याकरिता शासनाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव १४ आॅगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.

कोल्हापूर : मदरसा आधुनिकीकरणासाठी १४ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव द्या : जिल्हाधिकारी
कोल्हापूर : मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, तसेच शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याकरिता शासनाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव १४ आॅगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.
मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देणे,
मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या नववी, दहावी व बारावीतील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल, या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती दिली आहे.