शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:27 IST

प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्दे पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडाखिद्रापूर येथे जलव्यवस्थापन बैठक, सांडपाण्याचे होणार व्यवस्थापन

कोल्हापूर : प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.सध्या जिल्ह्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा तापला असून, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार तातडीचा उपाय म्हणून सांडपाणी साठविण्यासाठी स्थिरीकरण तळे आणि बायोरेमिडिएशन पद्धतीद्वारे हे सांडपाणी नदीत जाण्यापासून थांबविण्यासाठी २२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. बायोरेमिडिएशन पद्धतीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांचेही सर्वेक्षण करण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य बंडा माने, प्रा. शिवाजी मोरे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, राणी खमेलट्टी, तसेच राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ना. बा. भोई, शिरोळचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव उपस्थित होते.

जैनापूर येथे सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटनजैनापूर येथील सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे, त्यामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते.या प्रकल्पांतर्गत तीन स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तळ्यांतून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून, या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.यावेळी राम शिंदे, सभापती अर्चना चौगले, उपसभापती संजय माने, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, राजगोंड पाटील यांच्यासह सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :riverनदीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर