शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भोंदू महाराजाच्या टोळीतील महिला पोलिस तृप्ती मुळीक अटकेत, ओरोसमधून घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:49 IST

कोल्हापूर : करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय ३४, ...

कोल्हापूर : करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय ३४, सध्या रा. ओरस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, मूळ रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हिला अटक झाली. जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. ११) तिला ओरस येथून अटक केली. गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी काढण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ७० हजारांची लूट करणाऱ्या टोळीत तिचा समावेश होता.कोकणातील दादा महाराज पाटणकर याने फिर्यादी कुलकर्णी यांना त्यांच्या कुटुंबावर जवळच्याच एका व्यक्तीने करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी काळी जादू करण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी ३ ऑक्टोबरला गुन्हा दाखल होताच, जुना राजवाडा पोलिसांनी टोळीतील सदस्य शशिकांत नीळकंठ गोळे (वय ६९, रा. बारामती, जि. पुणे) आणि कुंडलिक शंकर झगडे (वय ३८, रा. जेजुरी, जि. पुणे) या दोघांना अटक केली होती.या गुन्ह्यात एका महिला पोलिस कॉन्स्टेबलचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास करून संशयित पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिचा पोलिसांनी शोध घेतला. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी ओरसला जाऊन तिला अटक केली. ती मूळची दरवेश पाडळी येथील असून, तिचे अनेक कारनामे असल्याची परिसरात चर्चा आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.उपमुख्यमंत्र्यांच्या कारचे सारथ्यतृप्ती मुळीक ही २०११ मध्ये सिंधुदुर्ग पोलिस दलात चालक पदावर भरती झाली. तिने डिसेंबर २०२१ मध्ये सिंधुदुर्गमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारचे सारथ्य केले होते. त्या घटनेनंतर ती चर्चेत आली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी