शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

ए. एस. ट्रेडर्सच्या संचालकाची ७० लाखांची कार जप्त, कोल्हापूर पोलिसांची पुण्यात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:11 IST

लोकांचा पैसा अन् यांची मजा..

कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केलेल्या ए एस ट्रेडर्सचा संचालक विजय ज्योतिराम पाटील (रा. लाखे गल्ली, शिंदेवाडी- खुपिरे, ता. करवीर) याची ७० लाखांची जॅग्वार ही अलिशान कार कोल्हापूरपोलिसांनी पुण्यातून जप्त केली. गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, शाहूपुरी येथील ए एस ट्रेडर्स व त्यांच्या इतर उपकंपन्यांचे पदाधिकारी, संचालक, एजंटांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, मुंबईसह कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणच्या शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास सांगून गंडा घालून कंपन्या बंद केल्या. याप्रकरणी सन २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत मुख्य संशयितासह १६ जणांना अटक झाली आहे.दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असताना कंपनीचा संचालक विजय पाटील याची अलिशान कार पुण्यात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सखोल तपास केला. पुण्यातील सिल्वर गुडस, कंडोमनियम सोसायटी, पिंगळे वस्ती, मुंढवा येथे पाटील याची अलिशान जॅग्वार कार (एमएच ०९- एफएक्स ४६५४) मिळाली. कायदेशीर प्रक्रिया करून ती कार जप्त केली. जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विजय काळे, राजू येडगे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.

लोकांचा पैसा अन् यांची मजा..यापूर्वी एक एप्रिलला एजंट अमित अरुण शिंदे (रा.लिशा हॉटेलजवळ कोल्हापूर) याची ६० लाखाची अलिशान कार पुण्यातून जप्त करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीच्या नावे ही कार नोंद होती. लोकांचा पैसा आणि त्यावर एजंट, संचालक महागड्या कार, फ्लॅट, दागिने घेऊन मजा मारत होते. आपल्याला कोण काही करू शकत नाही असा त्यांचा आविर्भाव होता. परंतु पोलिसांनी आता एकेकाच्या नाड्या आवळायला सुरू केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस