शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

प्रशांत कोरटकरचा मोबाइल कोल्हापूर पोलिसांना मिळाला, तपासाला येणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:14 IST

आज फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे देणार

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याचा मोबाइल आणि सीमकार्ड नागपूर सायबर पोलिसांनी बुधवारी (दि. ५) जुना राजवाडा पोलिसांकडे सादर केले. इनकॅमेरा पंचनामा करून पोलिसांनी मोबाइल आणि सीमकार्ड ताब्यात घेतले. आवाजाच्या तपासणीसाठी दोन्ही वस्तू गुरुवारी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून कोरटकर याने इतिहास संशोधक सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, नागपूर पोलिसांकडेही एक फिर्याद दाखल झाली होती.कोरटकर याने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर तपासासाठी त्याचा मोबाइल आणि सीमकार्ड पोलिस ठाण्यात जमा करण्याची सूचना न्यायालयाने दिली होती. त्यानुसार कोरटकर याच्या पत्नीने त्याचा मोबाइल आणि सीमकार्ड नागपूर सायबर पोलिसांकडे सादर केले होते. नागपूर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी या दोन्ही वस्तू जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी सरकारी पंचांच्या उपस्थितीत इनकॅमेरा पंचनामा करून मोबाइल, सीमकार्ड जमा करून घेतले.फॉरेन्सिककडून होणार तपासणीफिर्यादी सावंत यांचा मोबाइल पोलिसांनी आठवड्यापूर्वीच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. आता कोरटकरचा मोबाइल तपासासाठी पाठवला जाणार आहे. दोन्ही मोबाइलमधील संभाषणाची ध्वनिफित तपासून हा आवाज सावंत आणि कोरटकर यांचाच आहे काय, याची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळावा, यासाठी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांना विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी न्यायालयात म्हणणे मांडणारन्यायालयाने कोरटकर याला ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. ११ मार्चला होणाऱ्या सुनावणीत पोलिस त्यांचे म्हणणे सादर करणार आहेत. कोरटकर याला अटक करून त्याची चौकशी करता यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnagpurनागपूरPoliceपोलिस