शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सराफ कामगारानेच रचला कट; सीमंधर ज्वेलर्समध्ये भरदिवसा झालेल्या चोरीचा कोल्हापूर पोलिसांनी लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:51 IST

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त, राजस्थानच्या तिघांना अटक 

कोल्हापूर : वर्दळीच्या भाऊसिंगजी रोडवरील सीमंधर ज्वेलर्समध्ये २५ जानेवारीला भर दुपारी झालेल्या चोरीचा उलगडा करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली. भोर (जि. पुणे) येथून पिंटू जयसिंग राठोड (वय २५) आणि पूनमसिंग आसूसिंग देवरा (वय २१, दोघेही रा. नून, पो. फुंगणी, जि. सिरोही, राजस्थान) यांना जेरबंद केले.चोरीचा सूत्रधार केतनकुमार गणेशराम परमार (वय २३, रा. नून, पो. फुंगणी, जि. सिरोही) याला उत्तरेश्वर पेठ येथून अटक केली. परमार हा भेंडे गल्ली येथील एका सराफाकडे काम करीत होता. तिन्ही संशयितांकडून चोरीतील २२४ ग्रॅम सोने, ६२ हजारांची रोकड आणि मोबाइल असा १५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमंधर ज्वेलर्समधील चोरीचा तपास सहा पथकांकडून सुरू होता. शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयित चोरटे पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. गुजरीत राजस्थान आणि बंगाल येथील कामगारांची संख्या जास्त आहे. यावरून माहिती काढली असता, ही चोरी राजस्थानातील काही चोरट्यांनी केल्याचे समजले.फोन कॉल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या चौकशीतून पोलिसांना ठोस माहिती मिळाली. त्यानुसार भोर येथील एका लॉजमधून पोलिसांनी पिंटू राठोड आणि पूनमसिंग देवरा या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत केतनकुमार परमार याने चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. अटकेतील तिन्ही संशयितांचा ताबा जुना राजवाडा पोलिसांकडे देण्यात आला.

तपास पथकाचे कौतुकपोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. निरीक्षक कळमकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, संजय कुंभार, प्रकाश पाटील, अमित सर्जे, विनोद चौगले, सतीश जंगम, आदींच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

बनावट चाव्याने केला कावा..केतनकुमार परमार हा भेंडे गल्ली येथील एका सराफ दुकानात काम करीत होता. कामाच्या निमित्ताने सीमंधर ज्वेलर्समध्ये त्याचा वावर होता. त्यानेच ज्वेलर्सच्या बनावट चाव्या तयार करून घेतल्या. राठोड आणि देवरा या दोन मित्रांना त्याने सीमंधर ज्वेलर्सची माहिती देऊन बनावट चाव्या पोहोचवल्या. त्यानुसार राठोड आणि देवरा हे दोघे चोरी करून पळाले, तर संशय येऊ नये यासाठी परमार हा कोल्हापुरात थांबला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस