कोल्हापूर पोलीस अजिंक्य

By Admin | Updated: May 25, 2015 00:29 IST2015-05-24T23:53:04+5:302015-05-25T00:29:12+5:30

अनिल सावंत स्मृती चषक हॉकी स्पर्धा : छावा (अ) संघाचा २-१ गोलफरकाने पराभव

Kolhapur Police Ajinkya | कोल्हापूर पोलीस अजिंक्य

कोल्हापूर पोलीस अजिंक्य

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस संघाने छावा (अ) संघाचा पराभव करीत पद्मा पथक आयोजित अनिल सावंत स्मृती चषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. लाईन बझार हॉकी मैदान येथे रविवारी कोल्हापूर पोलीस संघ व छावा (अ) यांच्यात अंतिम सामना झाला. हा सामना कोल्हापूर पोलीस संघाने २-१ने जिंकला. पोलीस संघाकडून मुकुंद रजपूत, सत्यजित सावंत यांनी, तर छावा (अ)कडून विजय बंडागळे याने गोल नोंदविला. बक्षीस वितरणप्रसंगी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रीय हॉकीपटू राजेश पिल्ले, नगरसेवक अजित पोवार, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अभिजित खतकर, अशोक पोवार, बबन पाटील, महमद शेख, रमेश घाटगे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट खेळाडू
गोलरक्षक - प्रशांत काटकर (पोलीस संघ), डिफेन्स - संदीप सावंत (पोलीस संघ), उद्योन्मुख खेळाडू - आदित्य भोसले (पद्मा पथक), फॉरवर्ड - विनोद मनुगडे (पोलीस संघ), उत्कृष्ट खेळाडू - मुकुंद रजपूत (पोलीस संघ)

Web Title: Kolhapur Police Ajinkya