शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 08:18 IST

राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले.धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

धामोड - राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

मध्यरात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने सध्या धरणाचे सातही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी सात नंतरही परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोळी लोकांनी वेळीच स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोल्हापुराला पुराचा मोठा धोका संभावतो आहे.

मुंबई, कोकणात जोरधार; कोल्हापुरामध्ये पूरस्थिती

मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती 37 फुटांवर पोहोचली आहे. महापुराची 39 फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून एक गणेश भक्त वाहून गेल्याची घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या 129 आणि पूरबाधित 363 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोयना धरणातून 41 हजार 888 क्युसेक विसर्ग केला जात आहे. कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. सांगलीत कृष्णा नदीपातळी मंदगतीने कमी होत असली तरी पुराचा धोका अद्याप टळलेला नाही.

गोव्यात पावसाचा मारा जोरात सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीत अनेक मार्ग बंद सतत दुसऱ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती कायम आहे. अनेक मार्ग बंद आहेत. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणfloodपूर