शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ सभेची मूळ याचिका कायम, दोन याचिका मात्र तूर्त फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 7:34 PM

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत अंबाई दूध संस्थेने दाखल केलेली मूळ याचिका अद्याप कायम आहे. उर्वरित दोन याचिका मात्र तूर्त फेटाळ्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे ‘गोकुळ’ सभेची मूळ याचिका कायमदोन याचिका मात्र तूर्त फेटाळल्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत अंबाई दूध संस्थेने दाखल केलेली मूळ याचिका अद्याप कायम आहे. उर्वरित दोन याचिका मात्र तूर्त फेटाळ्यात आल्या आहेत.‘गोकुळ’ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा १५ सप्टेंबरला झाली. सभेच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने सहकार विभागाकडे याचिका दाखल केली होती. सहकार विभागाने सभेचे निर्णय न्यायालयीन पातळीवर असल्याचा निकाल दिल्यानंतर आमदार पाटील समर्थक अंबाई दूध संस्था, येवती (ता. करवीर) यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली.

दूध संघाच्या सत्तारूढ गटाने घेतलेली वार्षिक सभा बेकायदेशीर आहे. अवघ्या पाच मिनिटांत सभा गुंडाळून ज्यांचा संघाच्या व्यवस्थापनाशी संबध नाही, अशा व्यक्तीने प्रोसेडिंगचे वाचन केले. त्यामुळे ही सभा रद्द करावी, अशी मूळ याचिका दाखल केली.

त्याशिवाय १५ सप्टेंबरला झालेल्या सभेतील ठरावांची अंमलबजावणी करू नये व न्यायालयाच्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा पुन्हा घ्यावी, अशा पोट याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर १८ एप्रिलला सहकार न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये मूळ याचिका कायम ठेवत पोट याचिका तूर्त फेटाळल्या आहेत. मूळ याचिकेवर २० जूनला सुनावणी होणार आहे. 

‘गोकुळ’च्या सभेविरोधात आम्ही दाखल केलेल्या याचिकेपैकी मूळ याचिका कायम ठेवत पोट याचिका न्यायालयाने तूर्त फेटाळल्या आहेत; पण लाखो दूध उत्पादकांना निश्चित न्याय मिळेल.- किरणसिंह पाटील. अंबाई दूध संस्था-याचिकाकर्ते 

 

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर