शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

कोल्हापूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सीपीआरमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 3:51 PM

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाजवळ शुक्रवारी सुमारे २० मिनिटे निदर्शने केली.

ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सीपीआरमध्ये निदर्शनेराज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी संस्थेला देऊ नयेजिल्हाशल्यचिकित्सकांना निवेदन

कोल्हापूर : राज्यशासनाने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये चालवायला देऊ नये या प्रश्नी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाजवळ शुक्रवारी सुमारे २० मिनिटे निदर्शने केली. यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांना निवेदन देण्यात आले.सातारा जिल्हयातील महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तळदेव व तापोळा ही दोन केंद्रे पाचगणी (ता. महाबळेश्र्वर) येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस एक वर्षाच्या कालावधीकरिता प्रायोगिक तत्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या निर्णयाला संघटनेचा आक्षेप आहे. याची कारणे म्हणजे तेथील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा , सुविधा मिळणार नाहीत.

३०० खाटांची ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तत्काळ भरावीत. या रुग्णालयासाठी पुरेसा निधी शासनाने द्यावा. पण, शासन याचा विचार न करता खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण राबविण्याचा शासनाचा उद्देश आहे.त्याचबरोबर पीपीपी तत्वावार देणाऱ्या खासगी संस्थेस औषधे , उपकरणे, यंत्रसामुग्री , वेतन आदीवरील खर्चासाठी आरोग्य खाते प्रतिपूर्तीच्या स्वरुपात अनुदान देणार आहे. एकंदरीत, या सर्वांवर जिल्हाशल्यचिकित्सक ,जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य उपसंचालक यांचे नियंत्रण राहणार आहे.वरील बाबींचा विचार करुन शासनाने खासगीकरण व कंत्राटीकरण किंवा सार्वजनिक भागीदारी तत्वावर चालविण्याचा प्रयोग करु नये,अशी मागणी निवेदनात केली आहे.मध्यवर्ती संघटनेचे जिल्हासरचिटणीस अनिल लवेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनात अध्यक्ष वसंत डावरे, ज्ञानेश्र्वर मुठे , संदीप नलवडे, सतीश ढेकळे, विजय बागडे, संजय क्षीरसागर, हाश्मत हावेरी, संजीवनी दळवी, चंद्रकांत मोरे, श्रीमंतिनी पाटील , रमेश पाटील, सुधीर आयरेकर आदींचा सहभाग होता.

याप्रश्नी  शनिवारी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यांनाही याबाबतचे निवेदन देणार आहोत. पीपीपी तत्वाला आमचा विरोध आहे.-अनिल लवेकर,सरचिटणीस जिल्हा शाखा,कोल्हापूर. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर