कोल्हापूर : स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:42 IST2018-09-10T18:41:12+5:302018-09-10T18:42:30+5:30
पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजारामपुरी येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सागर शंभूशेटे, रमेश भोजकर, सूरज सुर्वे, आदी उपस्थित होते. (छाया- दीपक जाधव)
कोल्हापूर : पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात कॉँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याला सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही बंदमध्ये सहभागी झाली. संघटनेच्या युवा आघाडीच्या वतीने राजारामपुरी येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.
संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश भोजकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य माणूस महागाईत होरपळू लागला आहे. त्यात पेट्रोल व डिझेल दरवाढीची भर पडली असून, आता या सरकारला घरी बसविल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, शहराध्यक्ष सूरज सुर्वे, अभि लोहार, सुरेश भंडारी, विठ्ठल पुरी, राज कोरगावे, आदी उपस्थित होते.
साखर वाटून निषेध!
पेट्रोल शंभरीकडे गेल्याचा उपहासात्मक आनंद ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून व्यक्त केला. येणा-जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना साखर देऊन हेच ते ‘अच्छे दिन’ असे कार्यकर्ते सांगत होते. वाहनधारकही आपल्या शेलक्या शब्दांत सरकारचा उद्धार करीत होते.