शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप, शहरात ऊन : अद्याप पंधरा बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:31 PM

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, शहरात दिवसभर खडखडीत ऊन : अद्याप पंधरा बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे.गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सरसर येणाऱ्या सरी पाणीच पाणी करीत होत्या; पण शुक्रवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली. सकाळी हलक्या सरी कोसळल्यानंतर पावसाने एकदम उघडीप दिली. कोल्हापूर शहरात तर दिवसभर ऊन राहिले. सायंकाळनंतर पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.शुक्रवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २२.२४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाला. कासारी धरणक्षेत्रात १८०, !घटप्रभा’मध्ये १६४, तर कोदे धरणक्षेत्रात १६६ मिलिमीटर पाऊस झाला.

पावसाचा जोरदार ओसरल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. पंचगंगेची पातळी दोन फुटांनी खाली आली असून, शुक्रवारी सायंकाळी ती २१.१ फुटांपर्यंत राहिली.

घरांच्या पडझडीत ४० हजारांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत दोन घरांची पडझड होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे. मौजे महिपालगड (ता. चंदगड) येथील वनिता विठ्ठल मोरे यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने चार लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (३.७५), शिरोळ (१.००), शाहूवाडी (३९.००), राधानगरी (३०.१७), गगनबावडा (६४.००), करवीर (७.३६), कागल (४.७१), गडहिंग्लज (३.२८), भुदरगड (११.००), आजरा (२८.७५), चंदगड (४८.००). 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmonsoon 2018मान्सून 2018