शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

कोल्हापूर :  ‘एफआरपी’बाबत १४ कारखान्यांना नोटीसा, नोव्हेंबर अखेर विभागात ७५४ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:37 IST

नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसाचे एफआरपी प्रमाणे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाने उचलला आहे. नोंव्हेंबर अखेर विभागातील सर्व कारखान्यांकडे सुमारे ७५४ कोटीची थकीत एफआरपी असून त्यातील चौदा कारखान्यांना नोटीसा लागू केल्या आहेत. व्याजासह शेतकऱ्यांना पैसे द्या आणि तसा अहवाल मंगळवारी (दि. १८) सादर करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत.

ठळक मुद्दे‘एफआरपी’बाबत १४ कारखान्यांना नोटीसा, नोव्हेंबर अखेर विभागात ७५४ कोटी थकीत व्याजासह बिले दिल्याचा अहवाल मंगळवार पर्यंत देण्याचे आदेश

कोल्हापूर : नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसाचे एफआरपी प्रमाणे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाने उचलला आहे. नोंव्हेंबर अखेर विभागातील सर्व कारखान्यांकडे सुमारे ७५४ कोटीची थकीत एफआरपी असून त्यातील चौदा कारखान्यांना नोटीसा लागू केल्या आहेत. व्याजासह शेतकऱ्यांना पैसे द्या आणि तसा अहवाल मंगळवारी (दि. १८) सादर करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत.आंदोलनानंतर एक रकमी एफआरपी वर तडजोड होऊन यंदा ऊस दराची कोंडी फुटली. दोन-तीन कारखान्यांचा अपवाद वगळता विभागातील बहुतांशी कारखाने १२ नोव्हेंबरला सुरू झाले. कायद्याने चौदा दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असताना महिना उलटला तरी हंगाम सुरू होऊन महिना उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांना दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून साखरेचे दर घसरल्याने एक रकमी एफआरपी देऊ शकत नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.

नोव्हेंबर अखेर कोल्हापूरसांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी सुमारे ३५ लाख टन ऊसाचे गाळप केले. विभागाची सरासरी एफआरपी २८०० रूपये होत असल्याने सुमारे ७५४ कोटी रूपये थकले आहेत.थकीत एफआरपी साठी पहिल्या टप्यात चौदा कारखान्यांना नोटीसा काढल्या आहेत. मंगळवार पर्यंत संबधित कारखान्यांनी नोव्हेंबर थकीत एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांना देऊन त्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहावे, असे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखान्यांना दिले आहेत.

या कारखान्यांना काढल्या नोटीसाकोल्हापूर : जवाहर (हुपरी), दालमिया (आसुर्ले-पोर्ले), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), ओलम अ‍ॅग्रो (राजगोळी), दत्त (शिरोळ), शरद (नरंदे), छत्रपती शाहू (कागल).सांगली : सोनहिरा, राजारामबापू (युनिट साखराळे), राजारामबापू (युनिट वाटेगाव), राजारामबापू (कारंदवाडी), हुतात्मा किसन, क्रांती (कुंडल), दत्त इंडिया (वसंतदादा).

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगली