शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Kolhapur North By Election Result: शिवसेनेने मातोश्रीचा आदेश खरा करुन दाखवला..भाजपला लीड तुटलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:46 IST

कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले.

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पंधराव्या फेरीअखेर निर्णायक १३ हजार ९९८ मतांची आघाडी घेतली आहे. एकूण २६ फेऱ्या आहेत. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी तगडे आव्हान दिले परंतू कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले.मोजलेल्या पंधरापैकी दहा फेऱ्यांमध्ये काँग्रेसला तर पाच फेऱ्यांमध्ये भाजपला मताधिक्कय मिळाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेला शब्द शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करून खरा करून दाखविल्याचे चित्र पुढे आले आहे.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही निवडणूक झाली. एकूण २ लाख ९१ हजार मतदारांपैकी १ लाख ७५ हजार ३४१ (६१.१९ टक्के) मतदारांनी हक्क बजावला होता. एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. परंतू लढत दुरंगीच झाली.भाजपचे हिंदुत्व विरुध्द महाविकास आघाडीचा शिव-शाहूचा विचार अशीच ही लढत झाली. कोल्हापूरची जनता शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या शहरात कोणत्या विचारांना बळ देते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शनिवारी दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ९८ हजार ९१४ मते मोजण्यात आली. त्यापैकी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांन ५८३५१ तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ४४३५३ मते मिळाली.तिसऱ्या क्रमांकाची ९१६ मते नोटाला मिळाली आहेत. करुणा मुंडे यांना आतापर्यंत अवघी ७५ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहीन शेख यांना ३१९ मते मिळाली आहेत. पोस्टल मतांमध्ये काँग्रेसच्या जाधव यांना ३१५ तर भाजपच्या कदम यांना २१४ मते मिळाली आहेत. टपाली मतांतही जाधव यांना १०१ मतांची आघाडी मिळाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा