शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

Kolhapur North By Election: विधवा भगिनीवर तुटून पडलेल्या लांडग्यांना गाडा, खासदार विनायक राऊतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:26 IST

कोल्हापूर : सत्तेसाठी हापापलेला भाजप म्हणजे गिधाडांची औलाद असून, देशाची सत्ता दिली तरी हाव कमी झालेली नाही. पोटनिवडणुकीत जयश्री ...

कोल्हापूर : सत्तेसाठी हापापलेला भाजप म्हणजे गिधाडांची औलाद असून, देशाची सत्ता दिली तरी हाव कमी झालेली नाही. पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या अभागी भगिनीने मदतीचा पदर पसरला आहे. त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्यावर तुटून पडलेल्या भाजपच्या लांडग्यांना गाडा, असे आवाहन शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केले. ही निवडणूक काँग्रेसची नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेची आहे, यासाठी त्यांच्या पदरात मताचे दान भरभरून टाकून त्यांना विजयी करा, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ शनिवारी शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

खासदार राऊत म्हणाले, उत्तर प्रदेश हातातून जाते म्हटल्यानंतर ‘एमआयएम’शी हात मिळवणी केली. आता ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीकडे दोस्तीचा हात मागण्यामागे ही खेळीही भाजपचीच असून, हिंदुत्व व शिवसेनेमध्ये विष कालवले आहे. केवळ सत्तेसाठी ‘एमआयएम’ला बटिक बनविले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाइकांवर सुडाची कारवाई केली. यदाकदाचित या नतद्रष्टांनी उद्धव ठाकरे यांना धक्का पोहोचविण्याचे पाप केले तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल आणि त्यामध्ये भाजप जळून खाक होईल.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, मी शिवसेनेपासून बाजूला जाण्यासाठी काहींनी प्रयत्न केले; पण माझ्या रक्तात शिवसेना आहे. त्यामुळे जयश्रीताई तुम्ही काळजी करू नका, ५० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आलात.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनेमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा डाव आहे. हिंदुत्व शिवसेनेला शिकवू नये, आता उमेदवारीवरून भाजपमध्येच अस्वस्थता असून, अजित ठाणेकर, महेश जाधव हे का चालले नाहीत. सर्व पक्षातून फिरून आलेल्यांना उमेदवारी दिली, मग तुमचे हिंदुत्व कसले?

शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सुजित चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

दादा चंबूगवाळे गुंडाळा...

चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही वल्गना करा, आता चंबूगवाळे गुंडाळून हिमालयात प्रयाण करा, हवी असेल तर आम्ही वर्गणी काढून देतो, असा टोला खासदार राऊत यांनी हाणला.

पवार, क्षीरसागर बाळासाहेबांचे शिवसैनिक

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर संजय पवार व राजेश क्षीरसागर एकदिलाने कामाला लागले, ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, ते कधीही त्या विचारापासून दूर जाणार नाहीत.

राज्यपाल नव्हे....‘तात्या सरपंच’

राज्याच्या घटनात्मक पदावर एक उपद्रवी माणूस बसला असून, हे ‘तात्या सरपंच’ भाजप सांगेल तशा पद्धतीने काम करीत असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत BJPभाजपा