कोल्हापूर : शिवाजी पेठेत झाला निर्भय मॉर्निंग वॉक, कार्यकर्त्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:54 IST2018-08-20T13:44:30+5:302018-08-20T13:54:48+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉक काढला.

कोल्हापूर : शिवाजी पेठेत झाला निर्भय मॉर्निंग वॉक, कार्यकर्त्यांची उपस्थिती
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉक काढला. भर पावसातही कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले.
दाभोलकर यांच्या मारेकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे त्याबद्दल पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त करून कॉ उदय नारकर म्हणाले, या खुनामागील मेंदू कुणाचा आहे याचा शोध लागेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही..याउलट आम्ही तो अधिक तीव्र करू..दाभोलकर-पानसरे हे मानव कल्याणचा विचार मांडत होते त्यांना मारणारे हे समस्त मानव जातीचे मारेकरी आहेत..एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील म्हणून त्यांना संपविण्यात आले.
या फेरीमध्ये प्राचार्य टी एस पाटील, सीमा पाटील, हसन देसाई, सतीश पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर, अनिल चव्हाण आदी सहभागी झाले.