कोल्हापूर : राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:10 IST2018-12-10T12:07:15+5:302018-12-10T12:10:54+5:30
कोल्हापूर महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे या विजयी झाल्यानंतर महानगरपालिकेसमोर सोमवारी जोरदार जल्लोष करण्यात आला.

कोल्हापूर : राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापूर : महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे या विजयी झाल्यानंतर महानगरपालिकेसमोर सोमवारी जोरदार जल्लोष करण्यात आला.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशाचा दणदणाट, तुतारीचा निनाद आणि विजयाच्या घोषणात देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते, मोरे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सोमवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवड झाली. या निवडीवेळी अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते. सकाळी अकराच्या सुमारास महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली.
साडेअकराच्या सुमारास महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचे वृत्त समजताच महानगरपालिकेसमोर थांबलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थकांनी जल्लोष सुरू केला. ढोल ताशाचा दणदणाट, तुतारीचा निनाद आणि विजयाच्या घोषणाने परिसर दणाणून गेला.